spot_img
अहमदनगर'मंगळवारी कत्तल की रात' मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त, ४६९ गुन्हेगार...

‘मंगळवारी कत्तल की रात’ मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त, ४६९ गुन्हेगार तडीपार

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
मोहरमच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी(१६) रात्री कत्तल की रात मिरवणूक निघणार आहे. तसेच बुधवारी मोहरम मिरवणूक निघणार आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहरातून ४६९ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दोन दिवस तडीपार करण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी आषाढी एकादशी साजरी होत असून पोलिस प्रशासनन देखील खबरदारी घेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

नगर शहरात मागील काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्था धोयात येईल, तणाव निर्माण होईल, अशा घटना मागील काही महिन्यात घडलेल्या आहेत. त्यातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यातच आता मोहरम निमित्त मंगळवारी रात्री कत्तल की रात तसेच बुधवारी मोहरत मिरवणूक निघणार आहे. मिरवणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून पोलिस प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्याला दोन दिवस तडीपार केले आहे.

दरम्यान कत्तल की रात मिरवणूकी निमित्त पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी देखील पोलिस बंदोस्तचा आढावा घेतला आहे. कोठला. हवेली, मंगलगेट, हातमपुरा, सर्जेपुरा, कोंड्यामामा चौक, पिजांर गल्ली, माळीवाडा, पंचपीर चावडी यांच्यासह संवेदशील परिसरात पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच अहमदनगर पोलिस प्रशासनाने कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १००, तोफखाना हद्दीतून १८० व भिंगार हद्दीतून १८९ अशा तब्बल ४६९ जणांना १६ व १७ जुलै अशा दोन दिवसांसाठी नगर शहरातून तडीपार केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...