अहमदनगर। नगर सहयाद्री:-
आखिल भारतीय काँग्रेस कमिटी, ओबीसी विभागच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ या नगर शहर विधानसभा निवडणुकी साठी इच्छुक उमेदवार असून त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे मात्र शेवटी पक्ष जो आदेश देईल तीच आपली भूमिका असून जनतेचा कौल घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं मंगल भुजबळ यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांचे अर्ज मागविले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीकडे आलेले हे अर्ज प्रदेश काँग्रेसकडे पाठवले आहेत. प्रदेश काँग्रेसकडून या अर्जांची छाननी केल्यानंतर ते अर्ज राष्ट्रीय काँग्रेसकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर उमेदवारीचा निर्णय राष्ट्रीय काँग्रेसकडून जाहीर करण्यात येईल.
मंगल भुजबळ यांनी सध्या मतदारांच्या भेटी गाठी सुरू केल्या असून नगर शहर मतदारसंघातून आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महिलेला विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याच पक्षाने तिकीट दिलेले नाही त्यामुळे काँग्रेसने जर आपल्याला उमेदवारी जाहीर केली तर निश्चितच नगर शहर विधानसभा मतदारसंघात बदल घडू शकतो आणि नगर शहर विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला म्हणून आपण विधानसभेत निवडून जाऊ शकतो असा विश्वास मंगल भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
भुजबळ यांनी काँग्रेस पक्ष्याकडे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरल्यावर नगर शहरात ओबीसीची संख्या 60 टक्के असल्याने सर्वप्रथम त्यांनी 13 ऑगस्टला काँग्रेस चे राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष माजी मंत्री अजयसिंह यादव साहेब व काँग्रेस ओबीसी प्रदेशअध्यक्ष भानुदास माळी साहेब यांना अहिल्यादेवी होळकर या ओबीसी प्रवर्गातील असल्याने त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त चोंडी व नगर शहरात आणुन काँग्रेस ओबीसीचा मेळावा घेऊन विधानसभेसाठी वातावरण निर्मिती केली त्याचंवेळी नगर शहरातील विविध सामाजिक, राजकीय प्रतिनिधी यांच्याशी राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष यांनी चर्चा करून ओबीसी मेळाव्यात मंगल भुजबळ यांना नगर शहरात विधानसभेसाठी वातावरण चांगले असून त्यांच्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयन्त करणार असल्याचे सांगितले.
काँग्रेस ओबीसी प्रदेशअध्यक्ष भानुदास माळी यांनी काँग्रेस महिलांना 33%आरक्षण देणार आहे असे स्वतः खासदार राहुल गांधी यांनी सांगितले असल्याने महाराष्ट्रातील ओबीसी उमेदवारांच्या यादीत त्यांनी महिला म्हणून भुजबळ यांचे नाव काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे शिफारस करून पाठवले असल्याचे सांगितले त्यामुळे इच्छुक उमेदवारीच्या त्यांच्या नावाला पक्ष्यातूनंचं पाठबळ मिळाल्याचे दिसले त्यामुळे सध्या भेटीगाठी आणि नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मंगल भुजबळ नागरिकांशी संपर्क करत आहेत.
शहरातील एमआयडीसी त्याचबरोबर शहरातील मूलभूत प्रश्न याकडे प्रामुख्याने मंगल भुजबळ यांनी लक्ष केंद्रित केले आहे. बेरोजगारी मिटवण्यासाठी एमआयडीसी मध्ये मोठमोठे प्रकल्प आणणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नगर शहरा जवळ असलेल्या महानगरपालिका आणि महसूल विभागाच्या जमिनीच्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या माध्यमातून विविध मोठे पर्यटन स्थळे निर्माण केली तर त्याचा फायदा अहमदनगर शहराला होऊ शकतो त्यामुळे अहमदनगर शहराची आर्थिक स्थितीही चांगलेच सुधारेल असाही अजेंडा मंगल भुजबळ यांच्याकडे आहे. त्यामुळे निवडणुकीची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आपण सर्व गोष्टी जनतेसमोर मांडणार असून त्याच बळावर जनता आपल्याला निवडून देईल असा विश्वासही मंगल भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.