spot_img
अहमदनगर'मांडओहोळ'ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला 'हा' इशारा

‘मांडओहोळ’ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यात गावागावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून तालुक्याची तहान भागवणार्‍या मांडओहोळ धरण परिसर प्रशासनाने टंचाई क्षेत्र जाहीर केले आहे. त्यामुळे सार्वजनिक व शासकीय पाणीपुरवठा योजना व विहिरी वगळता शेतकर्‍यांनी २३ फेब्रुवारीपर्यंत शेतीपंप काढून घ्यावे अन्यथा प्रशासनातर्फे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे तहसीलदार गायत्री सौंदाणे, गटविकास अधिकारी ज्योत्सना मुळीक यांनी सांगितले.

१५ फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मांडओहळ धरण परिसारातील सर्व नागरिक व शेतकरी यांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. मांडओहळ परिसातील शासकीय पाणी पुरवठा योजना व पाणी वापर मजूर सहकारी संस्था सोडुन इतर वीजपंप, पाईप दि. २३ फेब्रुवारीपूर्वी काढुन घेण्याचे या आवाहनात म्हटले आहे. २३ फेब्रुवारीनंतर प्रशासनाला खासगी पाणी उपसा संबंधित कोणत्याही प्रकारची साधने मांडओहळ परिसात आढळली, तर ते साहीत्य जप्त करण्यात येईल. तसेच संबंधित मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कान्हुर पठारचा पाणी टंचाई प्रस्ताव दाखल
पारनेर तालुक्यातील अनेक गावांसह वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई जाणवू लागली आहे. कान्हुर पठारसह वाड्या वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. वेसदरे, पिंपरी पठार, पिंपळगाव रोठा, पिंपळगाव तुर्क या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

अन्यथा महावितरणसह शाखा अभियंतावर गुन्हे दाखल होणार…
गेल्या वर्षी मांडओहोळ धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने प्रशासनाला दुसरा उद्धभव शोधण्याची वेळ आली होती. यावेळेस पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली तर परिस्थितीला जबाबदार मांडओहोळ येथील शाखा अभियंता अभिजित मोरे व महावितरण अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा प्रांत अधिकारी गणेश राठोड यांनी टंचाई आढावा बैठकीत दिल्याचे समजते. मांडओहोळ धरणाचे काही क्षेत्र जुन्नर तालुक्यात असून तेथील वीज प्रवाह खंडित करण्याचे पत्र प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी दिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खुशखबर! डिसेंबरमध्ये खात्यात 6100 रुपये येणार? कोणाला मिळणार? पहा

मुंबई / नगर सह्याद्री - केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो....

मरण पत्करेल मागे हटणार नाही; बाबा आढाव यांचा अजितदादांना समोरच इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले असले तरी ईव्हीएमविरोधात मोठे...

‘ मी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस ईश्वर…’; महाराष्ट्राच्या CM पदी देवेंद्र फडणवीस, ५ डिसेंबरला होणार शपथविधी..

मुंबई । नगर सहयाद्री: - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार असल्याची माहिती समोर...

नगर शहर हादरले! मुकुंदनगरमध्ये युवकाचा खून

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- मुकुंदनगर परिसरात शुक्रवारी सायंकारी एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना...