spot_img
अहमदनगरमांडओहळ धरण ओव्हरफ्लो! शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

मांडओहळ धरण ओव्हरफ्लो! शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
नगर कल्याण महामार्गापासून पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथून ५ कि. मी. वर असणारे व पारनेरच्या दुष्काळी उत्तर भागाला वरदान असलेला मांडओहळ मध्यम प्रकल्प बुधवारी सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी धरणाच्या सांडव्यावाटे पाणी पडले आणि धरण पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले. मांडओहोळ धरण भरल्याने पर्यटकांसह शेतकरी तालुका वासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मांडओहळ प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट आहे. पळसपूर, नांदुरपठार, सावरगाव परिसरासह मांडओहळ प्रकल्पाच्या गेल्या चार दिवसापासून पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणात अखेर 399 पैकी 380 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्यावर्षी पाऊस कमी होता त्यामुळे धरण भरले नव्हते यावर्षी पावसामध्ये सातत्य नसल्याने धरण दोन महिने उशिरा भरले आहे.

मांड ओहळ धरण हे मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक येथील पर्यटकांना आकर्षित करत आले आहे. त्यामुळे आता यावर्षी या ठिकाणी पाण्यात भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करतील त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे येथे जवळच असलेला रुईचोंढा धबधबा हा पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहे. त्यामुळे तो पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो, मात्र गेल्या काही वर्षापासून रुईचोंढा धबधबा मांडवळ धरण परिसरामध्ये अपघाताच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे पर्यटकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

विकास होण्यासाठी प्रयत्न करणार
मांड ओहोळ हा प्रकल्प पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात आहे हा पट्टा तसा दुष्काळी त्यामुळे सध्या तरी पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटन विकासाच्या सुद्धा संधी आहेत. यापुढील काळात पर्यटन विकास होण्यासाठी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
प्रकाश गाजरे (सरपंच, म्हसोबा झाप)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...