spot_img
अहमदनगरमनपात शुकशुकाट; कार्यालय कर्मचाऱ्यांनी ठेवली बंद, काय म्हणतायेत कर्मचारी पहा...

मनपात शुकशुकाट; कार्यालय कर्मचाऱ्यांनी ठेवली बंद, काय म्हणतायेत कर्मचारी पहा…

spot_img

अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू
अहमदनगर / नगर सह्याद्री –
अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या आठ वर्षापासून प्रलंबित असून तो राज्य सरकारने तातडीने मार्गी लावावा यासाठी मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने उपोषण सुरू केले असून आज तिसऱ्या दिवशी मनपा कर्मचाऱ्यांनी चारही प्रभाग कार्यालय बंद ठेवून उस्फूर्तपणे उपोषणाला पाठिंबा दिला असल्यामुळे मनपात शुकशुकाट पाहायला मिळाला. यावेळी उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांची तब्येत खालावत चालली आहे, जो पर्यंत राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा इशारा यावेळी दिला.

अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू असून यावेळी शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, गणेश लयचेट्टी, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, किशोर कानडे, भीमराज कानगुडे, सतीश बनकर, हेमा साळवे, येमूल, देशमुख, कुलकर्णी, जोशी, अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर, तसेच सचिव आनंद वायकर, अनंत लोखंडे, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड़ , सागर सालुंके, अजय सौदे, प्रफुल लोंढे, अजित तारु, अंतवन क्षेत्रे, विजय कोतकर, बाळासाहेब व्यापारी, अकील सय्यद, सखाराम पवार, महादेव कोतकर, अमोल लहारे, दिपक मोहिते, नागनाथ पवले, वसंत थोरात, अनवर शेख, सुनील चाफे, मेहेर लहारे, वैभव जोशी, परीक्षित बिडकर, राजू लयचेट्टी तसेच महापालिकेतील पुरुष व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कर्मचाऱ्यांनी उपोषणस्थळी आपल्या भावना व्यक्त करताना महापालिका प्रशासन व सरकारवर नाराजी व्यक्त करत म्हणाले की महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे काम प्रशासनाचे होते, मात्र कुठल्याही उपयोजना केल्या नाही, याचबरोबर आस्थापना खर्च जास्त असल्याचे कारण देत सरकार वेळ काढूपणा करत आहे, कर्मचारी उपाशी ठेवायचे आणि तुम्ही तूपाशी राहायचे हा कुठला न्याय ? कर्मचाऱ्यांनी आता एकीची ताकद दाखवत जो पर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, कर्मचारी रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत असतो मात्र त्याचा कष्टाला फळ मिळत नसल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘गाडी बाजूला घे’ म्हटल्याचा राग; एसटी बसचालकाला मारहाण, बसवर दगडफेकही

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील पुणेरोड बसस्थानकाजवळील स्वस्तिक चौकात ‘एसटी बस वळवण्यास अडथण होत आहे,...

दारूड्याचा भाऊजीवर सपासप चाकूहल्ला ; कुठे घडला प्रकार पहा

लालटाकी येथे कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीलाही बेदम मारहाण अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील लालटाकी भागातील बारस्कर...

प्रस्तापितांचा विरोध पत्करला पण शिवाजीराव कर्डीले यांनी सर्वसामान्यांशी नाळ तुटू दिली नाही, आता अक्षय कर्डीले यांनी…

  आम्ही सर्व अक्षय कर्डिलेंच्या पाठिशी ः प्रा. राम शिंदे/ सहकार सभागृहातील सर्वपक्षीय शोकसभेत स्व....

उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात पडघम वाजले आहेत....