अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात मद्य सेवन केलेल्या व्यक्तीने महिलेच्या घरात जबरदस्ती शिरून विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी (30 मार्च) रात्री आठच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावसाहेब मारूती पोतकुले (रा. कौडगाव, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहेत. रावसाहेब पोतकुले हा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर दारू पिऊन आला. त्याने फिर्यादीच्या पाठोपाठ त्यांच्या घरात घुसून तिच्याशी अलील वर्तन केले. फिर्यादीस मला तू खूप आवडते, मी तुझ्यावर बऱ्याच दिवसांपासून नजर ठेवली आहे.
असे म्हणत त्याने तिचा उजवा हात पकडला व जबरदस्तीने जवळ ओढले. तसेच, दुसऱ्या हाताने अलील कृत्य केले. फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर संशयित आरोपीने तिथून पळ काढला. या घटनेमुळे घाबरलेल्या पीडिताने अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनास्थळी तालुका पोलिसांनी भेट दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.