spot_img
अहमदनगरखारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

spot_img

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

अहिल्यानगर जिल्ह्यातील खारेकर्जुने येथील गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्री एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात अडकला तर दुसरा बिबट्या विहिरीत आढळून आला. विहिरीत पडलेल्या नरभक्षक बिबट्याला ठारा मारा अन्यथा आम्ही फाशी घेऊ अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. महिलांनीही बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास विरोध केला. डीएनए केल्यानंतर बिबट्याला ठार मारण्यात येईल असे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, वन विभाग, पोलिस, नागरिकांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले. २४ तासात दोन बिबटे जेरबंद करण्यात आले.


खारेकर्जुने येथे पाच वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून जिवे मारले. निंबळक येथे आठ वर्षाच्या मुलाला जखमी केले. प्राण्यावर हल्ले केले. आठ दिवसापासून परीसरात भितीचे वातावरण आहे. बिबट्याला जीवे मारण्यासाठी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे खारेकर्जुने परिसरातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश रविवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्याकडून हे निर्देश जारी करण्यात आले. दरम्यान रविवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍या बिबट्या अडकला. सोमवारी सकाळी पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याला विन विभागाचे पथक घेऊन गेले. याबाबात ग्रामस्थांना कोणतीच कल्पना न दिल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वनविभागाच्या कर्मचार्‍यांना जाब विचारला.


दरम्यान सोमवारी दुपारी खातगाव रोडला पानसंबळ वस्तीवर एका विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. बिबट्या विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. तसेच बिबट्याला विहिरीतून पकडण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे पथक दाखल झाले. पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी पिंजराही आणला. बिबट्याचा डीएनए केल्यानंबर बिबट्याला मारण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन वनविभागाने नागरिकांना दिले. त्यानंतर वन विभाग, पोलिस यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू करत बिबट्याला बाहेर काढले.

ग्रामस्थांनी घेतली आक्रमक भूमिका
बिबट्याने खारेकर्जुने येथील मुलीला ठार मारले. निंबळकमध्ये मुलावर हल्ला केला. पाळीव प्राण्यांवर हल्ले केले. त्यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. विहिरीत पडलेला बिबट्या नरभक्षक आहे. त्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढू नका, ठार मारा अशी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेशही दिले असल्यामुळे बिबट्याला विहिरीतून बाहेर काढू नका, बिबट्याला ठार मारा अशी मागणी लावून धरली. दुपारी वन विभाग, पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू करत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.

अनुचित प्रकार घडल्यास वनविभाग जबाबदार ः प्रताप शेळके
पकडलेला बिबट्या वनविभागाने ग्रामस्थांना दाखवलाच नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामस्थ संभ्रमावस्थेत आहेत. बिबट्याबाबत यापुढील काळात अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी वनविभाग, जिल्हाधिकारीे जबाबदार राहतील असे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी सांगितले.

ग्रामस्थ म्हणतात बिबट्या दाखवलाच नाही
गेल्या आठ दिवसांपासून खारेकर्जुने परिसरात बिबट्या ने धुमाकूळ घातला आहे. सहा वर्षीय चिमुरडीचा जीव घेतला. तर निंबळकमध्ये मुलावर हल्ला केला. त्यामुळे परिसरातील लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने गावात पिंजरे लावले आहेत. या पिंजर्‍यात रात्री बिबट्या अडकला. वनविभागाने सोमवारी सकाळी पकडलेला बिबट्या घेऊन गेले. दरम्यान ग्रामस्थांनी आक्रमक होत विनविभागाने बिबट्या धरलाच नाही, ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पकडलेला बिबट्या ग्रामस्थांना दाखवलाच नसल्याच्या आरोप ग्रामस्थांनी केला.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

थंडीने तीन वर्षांचा विक्रम मोडला; कुठे किती पहा

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : राजधानी दिल्लीमध्ये नोव्हेंबर महिन्यातच थंडीत मोठी वाढ जाणवू लागली...