अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील सागर हॉटेलजवळ राहणाऱ्या स्नेहल निखिल शेकडे (वय 34, व्यवसाय वकिली) यांना त्यांचे पती निखिल चंद्रकांत शेकडे यांनी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना 14 ऑगस्ट 2025 रोजी रात्री घडली असून, याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
स्नेहल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निखिल यांनी दारूच्या नशेत त्यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत शिवीगाळ केली. यानंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत मारून टाकीन अशी धमकी दिली.
इतकेच नव्हे, तर बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी स्नेहल यांच्या गळ्याला धरले. या मारहाणीत स्नेहल जखमी झाल्या असून, त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. तोफखाना पोलीस पुढील तपास करीत आहेत.