अहिल्यानगर । नगर सहयाद्री
पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाचा राग मनात धरून स्विफ्ट कारने पाठलाग करून तरुणाची हत्या करणारा आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आरोपीच्या ताब्यातून स्विफ्ट गाडी, तीन मोबाईल असा एकूण ५ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तेजस संजय काळे ( वय-19 वर्षे रा. कानगुडेवाडी ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी सुभाष शंकर जाधव (रा. झरे, ता. करमाळा) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. २८ ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता, मयत चंद्रशेखर रामदास जाधव हे मित्र पृथ्वीराज साळुंके यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार क्रमांक (एम.एच.16.डी.सी.8185) ने करमाळा रोडवर जात असताना आरोपी तेजस संजय काळे (रा. कानगुडेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याने त्यांच्या ताब्यातील स्विप्ट कार क्रमांक (एम.एच.12.एन.जे.5720) ने पाठलाग करून जोरदार धडक दिली.
धडकेत मयत चंद्रशेखर रामदास जाधव यांचा मृत्यू झाला. तसेच मित्र पृथ्वीराज साळुंके देखील जखमी झाला होता. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गाभार्य ओळखत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 30 ऑक्टोबर 2025 रोजी बनपिंप्री गावाच्या शिवारात सापळा लावून आरोपी तेजस संजय काळेला ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल पोपट, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, चालक अरुण मोरे
यांनी केली आहे.



