spot_img
अहमदनगर'भाची' चा बदला घेण्यासाठी 'मामा' ने रचला डाव? भाचे जावयासोबत भर रस्त्यात...

‘भाची’ चा बदला घेण्यासाठी ‘मामा’ ने रचला डाव? भाचे जावयासोबत भर रस्त्यात ‘धक्कादायक’ प्रकार…

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
एक वर्षापूर्वी एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली होती. आत्महत्या केलेल्या तरुणींच्या मामाच्या डोक्यात भाचीच्या आत्महतेचा राग भिन्न-भिन्न करत होता. अखेर मानाने ‘भाची’ चा बदला घेण्यासाठी भाचे जावयाचा काटा काढण्यासाठी डाव रचला. सराईत गुन्हेगारांना हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आली आहे.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. शिवनाथ ज्ञानदेव चावरे (वय 41 रा. जळके खुर्द, ता. नेवासा), ज्ञानदेव उर्फ नारायण सूर्यभान लष्करे (वय 42 रा. पावन गणपती मंदीरासमोर, नेवासा), संदीप साहेबराव धनवडे (वय 39 रा. भेंडा खुर्द, ता. नेवासा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी: शिवनाथ चावरे याच्या भाचीचा विवाह शंतनु पोपट वाघ (रा. नेवासा) यांच्यासोबत झाला होता. दरम्यान, मागील एक वर्षापूर्वी भाचीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या व्देषातून भाचे जावई शंतनु वाघ यांचा काटा काढण्यासाठी मामे सासरे शिवनाथ चावरे याने सराईत गुन्हेगार ज्ञानदेव उर्फ नारायण सूर्यभान लष्करे, संदीप साहेबराव धनवडे व त्यांच्या इतर साथीदारांना सुपारी दिली होती.

त्यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09.30 वाजेच्या सुमारास शंतनू वाघ हे घरून दुचाकीवर खडका फाटा येथील त्यांच्या खडीक्रेशकडे जात असताना त्यांचा पाठलाग केेला. रस्त्यात बोलेरो वाहनाची शंतनुच्या दुचाकीला धडक देऊन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रृती सौरभ पोखरकर (रा. बालेवाडी स्टेडीयम जवळ, म्हाळुंगे, पुणे) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन तसेच वाघ यांच्या घरापासून ते घटना ठिकाणापर्यंतचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले असता त्यामध्ये वाघ यांच्या दुचाकीचा एका पांढर्‍या रंगाच्या बोलेरो वाहनाने पाठलाग केल्याचे दिसून आले. सदर बोलेरो वाहनावरून शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून शिवनाथ चावरे, ज्ञानदेव उर्फ नारायण लष्करे व संदीप धनवडे यांना ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अतुल लोटके, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, संदीप दरंदले, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...

जामखेडमधील अत्याचार प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; आ.रोहित पवार आक्रमक

कर्जत/ जामखेड । नगर सहयाद्री:- पावसाळी अधिवेशनात आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील राशीन...

डिझेल टाकुन मित्रानेच मित्राला जाळले; पारनेर तालुक्यातील ‘त्या’ मृतदेहाचा उलगडला

सुपा । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर - पुणे महामार्गावर पारनेर तालुयातील नारायणगव्हाण गावच्या हद्दीत दि.१८...

कोट्यवधी रुपयांचा ‘गैरव्यवहार’; आमदार दाते विधानभेत गरजले, नेमकं प्रकरण काय?

पारनेर । नगर सहयाद्री:- गुरुवार दि. ३ जुलै २०२५ राज्यातील पशुधन विकास मंडळातील साहित्य...