spot_img
अहमदनगर...तर‌ ‘त्या‌’ अधिकाऱ्याचा शाहिस्तेखान करून टाका! आ. जगताप

…तर‌ ‘त्या‌’ अधिकाऱ्याचा शाहिस्तेखान करून टाका! आ. जगताप

spot_img

भगव्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन | भेर्डापूर येथे महाआरती
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे अन्‌‍ त्यांच्याच राज्यात त्यांच्याच पुतळ्यासाठी शिवप्रेमींना झटावे लागते, यासारखे दुर्दैव नाही. आज अर्धाकृती पुतळा बसला, लवकरच या ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी सर्वांनी एकजूट झाले पाहिजे. अतृप्त राजकारण्यांच्या विरोधापुढे झुकून एखादा अधिकारी जनरल डायर बनून पुतळा हटवण्यास आलाच, तर सर्वांनी छत्रपती होऊन त्याचा शाहिस्तेखान करून टाका. त्याशिवाय धर्म टिकणार नाही.

छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अहिल्यानगरमध्ये बसवण्याचे काम चालू आहे. परवानगी असो वा नसो, छत्रपती संभाजी राजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवणारच, त्यासाठी गटतट सोडून भगव्याखाली प्रत्येकाने एकत्र येण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले. भेर्डापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूत बसवण्यावरून काही अतृप्त राजकीय शक्तींनी या प्रकरणाला राजकीय वळण देत हिंदू धमयांमध्ये गट पाडून प्रशासनाला महाराजांच्या मूत बसवण्याविरोधात उभे केले. या प्रकरणात हिंदूंनी एक व्हावे, स्थानिक शिवप्रेमींना हिंदुत्ववादी राजकीय पाठबळ मिळावे, म्हणून राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग व नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी भेर्डापूर गावात महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी जगताप हे बोलत होते.

ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रच महाराजांचा आहे. त्यांची मूत बसवण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. महाराजांची मूत बसवण्याचा गावाने फक्त ठराव करावा, वरच्या पातळीवर त्याला पाठबळ द्यायचे काम आम्ही करूच, पण गावातील प्रत्येक हिंदूंनी एक होऊन गटतट विसरून एक झालं पाहिजे.बसवलेल्या मूतविरोधात कोणी प्रशासकीय अधिकारी जनरल डायरच्या रूपात गावात आलाच, तर आपण प्रत्येकाने शिवाजी महाराज होऊन त्या अधिकाऱ्याचा शाहिस्तेखान करण्याचे आवाहन जगताप यांनी केले. काही राजकीय शक्ती लोकसभा निवडणुकीत उदयास आल्या, त्यांनी आपल्याला जातीपातीत वाटून आपले ध्रुवीकरण केले, त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला.

10 हजार महिलांनी छावा मोफत पाहिला
अहिल्यानगर शहरात सध्या चालू असलेला छावा चित्रपट महिलांसाठी मोफत दाखवण्यात आला. आतापर्यंत दहा हजार महिलांनी हा चित्रपट बघितला असून, महिलांनी हा चित्रपट बघितल्यास ती महिला कुटुंबाला धर्माचे ज्ञान देते. त्या कुटुंबाला पुन्हा धर्म शिकवण्याची गरज पडत नसल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी मांडले.

गटतट विसरून एक व्हा; सागर बेग
राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी गावातील गटतट विसरून एक होण्याचे आवाहन केले. राजकारण म्हणून आम्ही धर्माचे कार्य करत नसून आपला धर्म जगला पाहिजे म्हणून आमची तगमग आहे, पण हिंदूच असे गटतटात विखरून आपली शक्ती वाया घालवत असतील तर त्याचा फायदा हिंदू विरोधी अधम जिहादी उठवतात, असे ते म्हणाले. उपस्थित मान्यवरांचा भूषण कुटे, सचिन दांगट, अमोल राऊत, नितीन दांगट यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘राज्यमंत्री मंडळाची बैठक ‘या’ तारखेला अहिल्यानगरमध्ये भरणार’; जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार?

जामखेड । नगर सहयाद्री:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मे महिन्याच्या अखेरीस...

पूजा खेडकर प्रकरणात मोठा निर्णय; सुप्रिम कोर्टात काय घडलं?, वाचा एका क्लिकवर..  

IAS Pooja Khedkar News: UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा...

तुमच्या घरावर भानामती? कुटुंबावर संकट! दोन महिलांनी रचला डाव; ३३ लाखाची ‘अशी’ केली फसवणूक

Maharashtra Crime News: आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जात आहे. यातून फसवणूक झाल्याचे देखील समोर...

नागरिकाभिमुख कारभारासाठी महानगरपालिका कटीबद्ध; आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकीय कामकाजासाठी ई ऑफीस प्रणालीचा वापर सुरू...