spot_img
महाराष्ट्रमला आमदार करा, एका वर्षात सगळे डुक्कर मारून टाकतो; भाजप उमेदवाराचे खळबळजनक...

मला आमदार करा, एका वर्षात सगळे डुक्कर मारून टाकतो; भाजप उमेदवाराचे खळबळजनक विधान…

spot_img

बीड / नगर सह्याद्री
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यभरात प्रचारसभांचा धडाका सुरू आहेत. यावेळी सत्तेत आल्यानंतर काय काय केलं जाईल याबाबतची आश्वासनं महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतदारांना दिली जात आहेत. त्याचसोबत उमेदवार देखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. अशामध्ये बीडमधील भाजपच्या उमेदवाराने तर नागरिकांना अजब आश्वासन दिले आहे. ‘मला आमदार करा, एका वर्षात सगळे डुक्कर मारून टाकतो.’, असं वक्तव्य भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी केले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

परळीचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या अजब आश्वासनानंतर आता महायुतीचे आष्टी मतदार संघाचे उमेदवार सुरेश धस यांनी मतदारांना एक अजब आश्वासन दिले आहे. ‘आपल्याकडे डुकरांची संख्या वाढली आहे यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. या आधी मी पंकजा मुंडे मंत्री असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त डुक्कर मारण्यासाठी नवाब हा शूटर आणला होता. आता सुद्धा डुक्कर मोठ्या संख्येत वाढले आहेत. त्यामुळे मला आमदार करा. एक वर्षात हे सगळे डुक्कर मारून टाकतो.’, असे अजब सुरेश धस यांनी दिले आहे. त्यांच्या या सभेची जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराने मतदारांना अजब आश्वासन दिलं होतं. शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी ‘जर मी आमदार झालो तर सर्व पोरांची लग्न करुन देईल.’, असं आश्वासन दिले होते. त्यांच्या या आश्वासनाची जोरदार चर्चा रंगली आहे. परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राजेसाहेब देशमुख हे धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...