spot_img
ब्रेकिंगनगरच्या आणखी एका बड्या पतसंस्थेत मोठा घोटाळा; धक्कादायक माहिती समोर

नगरच्या आणखी एका बड्या पतसंस्थेत मोठा घोटाळा; धक्कादायक माहिती समोर

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांची मुदत ठेव परत न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ठेवीदार अमेय रमेश मुदकवी (वय 50, रा. गृहशिल्प सोसायटी, बागरोजा, दिल्ली गेटजवळ, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या संचालकांसह 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 42 लाख सात हजार 710 रूपये मुदत ठेव म्हणून संस्थेत जमा करूनही रक्कम व व्याज न मिळाल्याचा आरोप मुदकवी यांनी केला आहे.

सत्यशील अविनाश अकोले, अनुप सत्यशील अकोले, शिल्पा शाम अकोले, शितल सत्यशील अकोले, शाम अविनाश अकोले (सर्व रा. पुर्णवाद नगर, रिंग रस्ता, जि. जळगाव), वेड्डू गणेश लोखंडे (रा. आंबेडकरनगर, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव), महेंद्र मनोहरलाल शर्मा (रा. आठवडे बाजार, बुर्‍हाणपुर रस्ता, रावेर, जि. जळगाव), जितेंद्र कृष्णमूर्ती कुलकर्णी (रा. सहकारनगर, सावेडी, अहिल्यानगर), नितीन शंकर राणे, विजय शंकर राणे (दोघे रा. क्रांती चौक, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव), नामदेव पांडुरंग कोळी (रा. विठ्ठलनगर, जि. जळगाव), महेश सुधाकर कुलकर्णी (रा. केडगाव, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

मुदकवी यांनी आपल्या वडील रमेश विष्णुपंत मुदकवी, आई उज्वला रमेश मुदकवी व भाऊ निखील रमेश मुदकवी यांच्या नावाने 5 नोव्हेंबर 2022 ते 19 डिसेंबर 2024 या कालावधीत पूर्णवाद पतसंस्थेच्या अहिल्यानगर शाखेत रोख स्वरूपात गुंतवणूक केली होती. संस्थेने त्याबदल्यात 13 टक्के परताव्याचे आश्‍वासन देत अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवले होते. रक्कम जमा करताना सर्व कागदपत्रे व मुदतठेव पावत्या संस्थेने दिल्या होत्या. परंतु, मुदत संपल्यानंतर संबंधितांनी रक्कम परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. 46 ते 300 दिवसांपर्यंत मुदत वाढवून केवळ वेळकाढूपणा करण्यात आला.

वारंवार मागणी करूनही केवळ आज देतो, उद्या देतो अशा आश्‍वासनाखाली मुदकवी कुटुंबासह इतर ठेवीदारांना संस्थेच्या कार्यालयातून परत पाठवण्यात येत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी 28 जानेवारी 2024 रोजी सभासदांची बैठक घेण्यात आली होती, यावेळी संस्थेच्या संचालकांनी 31 मार्च 2024 पर्यंत सर्व रक्कम परत देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. उलट व्यवस्थापक व संचालक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने ठेवीदारांची विश्‍वासघाताने फसवणूक झाल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...