spot_img
ब्रेकिंगस्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ जणांकडे काय गवसलं?

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ जणांकडे काय गवसलं?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारू विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका लावला. यात १५ अवैध दारु विक्रेत्यांवर छापे टाकून ७८ हजार ३९० रुपयांचा अवैध दारू व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने आश्वी, घारगाव, लोणी व राहाता पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांवर छापे घालून १५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.

त्यांच्याकडून न ७८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, बिरप्पा करमल, गणेश लोंढे, पंकज व्यवहारे, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रविंद्र घुंगासे, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, जालींदर माने, रणजीत जाधव, उमाकांत गावडे व महादेव भांड यांनी बजावली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...

पत्नीच्या डोक्यात घातला शॉकॉबसर; प्रेमविवाहाला कुणाची नजर लागली?, वाचा सविस्तर

Maharashtra Crime: विभक्त पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या अमरसिंग मारुती शिंदे (वय ३७, रा. इस्लामपूर)...

अहिल्यानगर जिल्ह्यात काविळीचं थैमान; २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

अकोले | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळ आजाराने थैमान घातले...

वीज चोरी भोवली; तिघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भिंगार हद्दीत वीज वितरण कंपनीच्या परवानगीशिवाय थेट वीज वापरून अनधिकृत...