spot_img
अहमदनगरस्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई;२४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई;२४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
पाथर्डी तालुक्यात वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्या ४ आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. यात एकूण २४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शाहेत युसूफ पठाण, रामेश्वर ताराचंद गलधर दोघे ( रा. चकलांबा फाटा, ता. गेवराई, जिल्हा बीड) ऋषीकेश गोरक्षनाथ शिरसाठ दोघे ( रा. शिरसाठवाडी, ता. पाथर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मा. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने, पोलीस निरीक्षक आहेर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांची पथके गठीत करून या अवैध कामगिरीतील इसमांची माहिती घेतली.

गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी तालुक्यातील दोन ठिकाणी कारवाई करत १५ लाख ६० हजार रुपये किंमतीचा भारत बेंझ कंपनीचा हायवा आणि ४ ब्रास वाळू तसेच ८ लाख ४० हजार रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा डंपर आणि ४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाची कोणतीही परवाना किंवा रॉयल्टी न घेता अवैधरित्या वाळू चोरी केली होती.

त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“काकाचं दर्शन घे, थोडक्यात वाचलास….”; अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

मुंबई / नगर सह्याद्री - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे....

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ...

पारनेरकरांना खुशखबर! मंत्री विखे पाटील म्हणाले, पुढील काळात..

आ. काशिनाथ दाते यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट पारनेर | नगर सह्याद्री पारनेर...