अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
वाळूची तस्करी करणाऱ्या अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ५९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार वेगवेगळया पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नमुद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सूचना केल्या. पथकाने गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव, मिरजगाव, पारनेर, नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध वाहतूकदारांवर कारवाई केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, ,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संदीप दरंदले, बिरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, रोहित येमुल, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, विशाल तनपुरे, रमीजराजा आत्तार, अशोक लिपणे व उमाकांत गावडे यांनी बजावली आहे.