संगमनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील घारगाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच अवैध दारू विक्रेत्यांवर छापे टाकले. यात 73 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बिरप्पा करमल, शाहीद शेख, गणेश धोत्रे, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार व उमाकांत गावडे अशांचे पथक तयार करून घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
20 एप्रिल 2025 रोजी पथकाने घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची बातमीदारामार्फत तसेच अवैध दारू विक्रेत्यांची माहिती काढुन घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्रेत्यांविरूध्द पंचासमक्ष 5 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. कारवाईमध्ये घारगाव पोलीस स्टेशनला खालीलप्रमाणे महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये 05 गुन्हे दाखल करण्यात येऊन 73 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.