कर्जत। नगर सह्याद्री
राशीन (ता. कर्जत) येथील आळसुंदा येथे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवलेली २६ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
पोनि दिनेश आहेर यांना १२ जुलै २०२५ रोजी पथक कर्जत परिसरात सचिन मोहन आढाव व हिरामन उर्फ भाऊसाहेब आढाव यांच्या मालकीच्या घराजवळील रानात कत्तलीसाठी जनावरे बेकायदेशीरपणे डांबून ठेवले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकत २६ गोवंशीय जनावरांची सुटका केली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात हिरामन उर्फ भाऊसाहेब आढाव (रा. राशीन), सचिन मोहन आढाव (रा. राशीन), बबलू उर्फ इरफान कुरेशी (रा. राशीन), सादिक कुरेशी (रा. कर्जत), समीर कुरेशी (रा. कर्जत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, अरुण मोरे यांनी केली आहे