शेवगाव । नगर सहयाद्री:-
शेवगाव येथील अवैध ऑनलाईन बिंगो जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. ३ आरोपीकडून १ लाख ४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत १० जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाला कारवाईचा सुचना केल्या. दरम्यान, पथकाला शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोची गल्ली येथे अवैध धंदा सुरु असल्याची माहिती मिळाली.
पथकाने कारवाई करत बळीराम भानुदास मोहिते ( रा.वडारगल्ली, ता.शेवगाव ), सोहेल रफीक शेख ( रा.नायकवाडी ता.शेवगाव ), मोहसीन सलीम शेख ( रा. ईदगाह मैदान, ता.शेवगाव ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी बिंगो जुगार अड्ड्यांचे मालक काळु उर्फ गोपाळ कुसळकर, सुरज कुसळकर दोघे (रा.वडारगल्ली, शेवगाव) (फरार) असल्याचे सांगितले. तसेच बिंगो जुगारासाठी लागणारे आयडी पासवर्ड अशपाक शेख ( रा.श्रीरामपूर), समीर कुरेशी ( रा.राहाता ), अफरोज शेख ( रा. श्रीरामपूर), महादेव उर्फ पांडुरंग कुत्तरवाडे ( रा.सोनई ), सलीम शेख (रा.शेवगाव) यांचेकडून घेतले असल्याची कबुली दिली. आरोपीविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेरयांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अंमलदार अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ यांनी बजावली आहे.