राहता । नगर सहयाद्री
राहता तालुक्यातील ममदापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून २१ गोवंशीय जनावरांची सुटका केली. दोन आरोपींना ताब्यात घेतले असून ९ लाख ३५ हजारांचा मुद्देमालासह जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ममदापूरात रविवारी छापा टाकला.
तेथे २१ जिवंत गोवंशीय जनावरे चार चाकी वाहनामध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवल्याचे आढळले. साजीद युनूस कुरेशी, रेहान अहमद अयाज कुरेशी दोघे ( रा.ममदापूर, ता.राहाता) अशांना ताब्यात घेतले. आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी फरार कार चालक शोएब यासिन कुरेशी (रा.ममदापूर, ता.राहाता ) असल्याचे सांगितले.
पथकाने २१ गोवंशीय जनावरांची सुटका करत इंडीगो कार, स्वीफ्ट कार, दोन मोबाईल असा एकूण ९ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही जनावरे शोएब यासिन कुरेशी, शाहीद उस्मान कुरेशी, मुद्दसर गुलाम कुरेशी (सर्व रा. (रा.ममदापूर, ता.राहाता ) यांनी कत्तलीच्या उद्देशाने आणल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील चार जण पसार झाले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश भिंगारदे, गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, अमोल कोतकर, मनोज लातुरकर, बाळसाहेब गुंजाळ, भगवान थोरात, सुनिल मालणकर, भाऊसाहेब काळे, अमृत आढाव, विशाल तनपुरे, प्रमोद जाधव, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार, शिवाजी ढाकणे व उमाकांत गावडे यांनी बजावली आहे.