पाथर्डी । नगर सहयाद्री:-
अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने छापेमारी करत कारवाई केली. दि. १७ जानेवारी रोजी गुप्त बातमीदारा मार्फत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका लाकाही इसम जेबीसीने अवैध वाळु उपसा करून, वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने छापा टाकला असता दोन इसम वृध्दा नदीपात्रातुन वाळु जेसीबीच्या सहाय्याने उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरत असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. आरोपीकडून २५ लाख रुपयांचा मुद्देमाल मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात बाळु भानुदास जाधव ( वय 42, रा.शंकरनगर, पाथर्डी ), संतोष भानुदास जाधव, ( वय 36, रा.शंकरनगर, पाथर्डी ) या दोघाविरुध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, रमीझराजा आत्तार यांच्या पथकाने केली आहे.