spot_img
अहमदनगर'माझी वसुंधरा ४.० अभियानात मनपाला सलग दुसर्‍या वर्षी पुरस्कार'

‘माझी वसुंधरा ४.० अभियानात मनपाला सलग दुसर्‍या वर्षी पुरस्कार’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:
माझी वसुंधरा ४.० अभियानात अहमदनगर महापालिकेला सलग दुसर्‍या वर्षी सहा कोटींचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. राज्यातील ड वर्ग असणार्‍या १९ महापालिकेतील दुसरा क्रमांक पटकावणारी अहमदनगर महापालिका ठरली आहे.

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ४.० अभियानांतर्गत घेतलेल्या अभियानात नगर महानगरपालिकेला या वर्षीही राज्यात दुसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात पनवेल महानगरपालिकेला प्रथम व नगरला ६ कोटी रुपयांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. यशवंत डांगे यांनी मनपा मध्ये उपायुक्त पदी असताना वसुंधरा अभियानात विशेष मेहनत घेऊन उपाययोजना केल्या त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा मुक्त शहराला थ्री स्टार मानांकन व हागणदारी मुक्त शहर ओडीएफ++ चे प्रमाणपत्र सातत्य ठेवून प्राप्त केले.

आजवर मनपाला माझी वसुंधरा अभियान २.० प्रथम क्रमांकाची उंच उडी मध्ये १.५० कोटी माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये ड वर्ग महापालिकेत द्वितीय ६ कोटी आणि यंदाच्या वर्षी माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये ड वर्ग महापालिकेत द्वितीय ६ कोटी चे या व्यतिरिक्त शहर सौंदर्यकरणांमध्ये ५ कोटींचे असे एकूण १८.५ कोटींचे बक्षीस मिळवून दिले. केलेल्या कामाचे चीज ते आयुक्त पदावर कार्यरत असताना झाले. नागरिकांच्या व महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे महानगरपालिका ही कामगिरी करू शकली, अशी भावना आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केली.

माझी वसुंधरा अभियानात मागील वर्षीही महानगरपालिकेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता. यंदाही महानगरपालिकेने चांगली कामगिरी करत आपले स्थान कायम राखले आहे. भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या घटकात शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या. शहरात या विषयी विविध अभियान राबवून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विशेषतः घनकचरा व्यवस्थापन विभाग व सफाई कामगारांनी घेतलेल्या मेहनतीमुळे महानगरपालिका ही कामगिरी करू शकली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...