कोपरगाव । नगर सहयाद्री
तालुक्याती सोनेवाडी माहेर असलेल्या नंदूबाई तुळशीदास जाधव या आपल्या पती तुळशीदास भीमराव जाधव यांच्यासमवेत मोटरसायकलवर येत असताना येसगाव येथील जिओ पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने नंदूबाई जाधव यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. पती तुळशीदास जाधव हे जखमी झाले. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
नांदगाव तालुक्यातील अनकवाडे येथील हे दाम्पत्य जेऊर कुंभारी व सोनेवाडी येथे आपल्या पाहण्यांना भेटण्यासाठी निघाले होते. कोपरगावच्या दिशेने येत असताना येसगाव शिवारातील जिओ पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने त्यामध्ये नंदूबाई जाधव या ठार झाल्या. तुळशीदास जाधव हे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी त्यांचे नातेवाईक राहुल साहेबराव जावळे, रा. सोनेवाडी यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अपघातातील ट्रक (नंबर आर जे ०९ जी.डी ५५२५) चालक हा धडक देऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे, अशी खबर दिली. त्यासार त्या अज्ञात चालकाविरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.