उपाध्यक्षपदी दीपक दरेकर, भगवान मते, नाना डोंगरे तर सचिवपदी हंबर्डे
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी महेंद्र हिंगे यांची तर उपाध्यक्षपदी दीपक दरेकर, भगवान मते, नाना डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. नगर तालुका क्रीडा समिती 2025-26 ची बैठक वाडियापार्क येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये अध्यक्षपदी महेंद्र गोरक्षनाथ हिंगे तर उपाध्यक्ष पदी दिपक बबन दरेकर, भगवान मते, नाना डोंगरे तर सचिवपदी हंबर्डे आर. आर, सहसचिव बाबासाहेब म्हस्के, खजिनदार बापूसाहेब जगताप, प्रसिद्धी प्रमुख बारगळ विष्णू, महिला प्रतिनिधी सौ. मनीषा पुंडे, अभिजित जगताप, पल्लवी जगताप, इंग्लिश मेडियम प्रतिनिधी खुडे गणेश तर तांत्रिक समिती सदस्य दत्ता पा. नारळे, शिरीष टेकाडे, दादासाहेब दुसुंगे, बाळासाहेब मुळे, बळीराम सातपुते, विजय जाधव, प्रताप बांडे, राजेंद्र कोतकर, बाळासाहेब बोडखे, मिलिंद थोरे यांची निवड करण्यात आली आहे. क्रीडा समितीच्या पदाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सर्वांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.