पारनेर| नगर सहयाद्री
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा व शिवसेना महायुतीचे सरकार असुन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात साखर व डाळ वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा मी जिल्हाध्यक्ष असताना नगर तालुयातील माझ्या वाळुंज गावात साखर व डाळ वाटपाचे अधिकृत निमंत्रण मला देण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपा पदाधिकार्यांकडून महायुतीचा धर्म पाळता जात नसल्याची खंत जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी खासदार सुजय विखे पाटील यांच्या समोर व्यक्त केली.
मंगळवारी दि. १६ जानेवारी रोजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व गावांना गोरगरीब जनतेला मोफत साखर वाटपाचा कार्यक्रमानिमित्त वाळुंज येथे आले असता त्यांचा सत्कार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी भाषणात वाळुंज गावात मी स्वतः राहतो व आमची छोटीशी शेती इथे आहे.
तसेच या कार्यक्रमाची महायुती जरी असली तरी कार्यक्रमाचा निरोप माझ्या स्वतःच्या गावात खासदार विखे येणार आहेत याची माहिती नव्हती. त्यामुळे जिल्हाध्यक्षांनी जाहीर खंत व्यक्त केली. तसेच खासदारांचे स्वागताला उपस्थित नव्हतो त्याची दिलगिरी सुद्धा मनोगतात व्यक्त केली. जिल्हाध्यक्षांनी ग्रामस्थांच्या वतीने खासदार सुजय दादांकडे मागणी केली कि, गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वाळुंज फाटा ते वाळुंज गाव खडीकरण व डांबरीकरण आपल्या खासदार निधीतून मंजूर करावे अशी विनंती केली.
त्याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रताप पाचपुते, सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी सभापती अभिलाष पाटील घिगे, तालुका विकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, चेअरमन व्हा. चेअरमन व इतर मान्यवर उपस्थित होते. क ार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाळुंज विद्यालयाचे प्राचार्य रोहाकले सर यांनी केले.