spot_img
महाराष्ट्रमहायुतीचा खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरला! कोणाकडे कोणते खाते? पहा..

महायुतीचा खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरला! कोणाकडे कोणते खाते? पहा..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:
सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला आहे. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी अजूनही मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. असे असताना आता एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे महायुती सरकारचा खातेवाटपाच फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे.

महायुतीच्या नवीन मंत्र्यांना त्यांच्या खातेवाटपसंबंधी येत्या 24 तासांत निर्णय कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या खातेवाटपासाठी शिवसेनेची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची यादी दिली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांत राज्यपालांना देणार संपूर्ण खाते वाटपाची यादी देणार असल्याचे बोलले जात आहे.

कोणाकडे कोणते खाते?
मागील मंत्रिमंडळीतील महत्वाची खाती ही त्या पक्षाकडे देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. तर गृह भाजपकडे, तर नगरविकास खातं शिवसेनेकडे राहणार आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपस्वतःकडेच ठेवणार असून तर शिवसेनेचे उत्पादन शुल्क खातं आणि राष्ट्रवादीला दिले जाणार असल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे या मंत्रिमंडळातील खातेवाटपात महत्वाचा बदल होणार आहे. तो म्हणजे भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण खातं शिवसेनेच्या ताब्यात जाणार आहे. महिला व बालविकास देखील राष्ट्रवादीकडेच राहणार आहे, अदिती तटकरेंची पुन्हा या मंत्रिपदी वण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कंटेनर चालकाचा प्रताप; दहा ते पंधरा गाड्यांना धडक, अनेकजण जखमी

पुणे / नगर सह्याद्री - चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरने दहा ते पंधरा...

मनपाचा ‘तो’ निर्णय अन्यायकारक! शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, जनतेवर बोजा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी...

.. तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; अविनाश घुले यांचा मनपाला इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर शहरातील नागरिकांना रोज पाणी पुरवठा करावा आणि मगच पाणीपट्टीत वाढ...

कोरठण खंडोबा यात्रोत्सव उत्साहात; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

पारनेर | नगर सह्याद्री:- पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र...