spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच; संगमनेर शहरातून निघणार विजयाची मिरवणूक

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच; संगमनेर शहरातून निघणार विजयाची मिरवणूक

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगरच्या १२ मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना धक्का बसलाच असल्याचे चित्र समोर आले असू अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून महायुतीची विजयाची मिरवणूक काढली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे यांनी तिरंगी लढतीत दोन्ही उमेदवारांना धूळ चारत पुन्हा एकदा आपला गड कायम राखला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप हे 39 हजार 650 मतांनी विजयी झाले आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आशुतोष काळे यांनी बाजी मारली असून 1,23,838 मतांनी विजय मिळविला आहे. जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एक मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे.

संगमनेर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी पराभव केला आहे.तर राहुरी मतदारसंघात मा आमदार प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात देखील जोरदार टक्कर पहायला मिळाली असून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा विजय झाला.

कर्जत जामखे मतदार संघामध्ये आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात अटीतटीचा सामना रंगला असल्याचे कटर आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आमदार मोनिका राजळे यांनी देखील आघाडी घेतली तर नेवासा मतदार संघात देखील आमदार गडाख यांना टक्कर देत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ललराव लंघे यांनी विजय मिळवला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! अचानक जोडप्याने आयुष्य संपवलं, विषारी औषध प्राशन करून आत्महत्या, कारण…

Maharashtra Crime News: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संभाजीनगरमध्ये घडली....

२४ तास धोक्याचे! नगरमध्ये अवकाळी पाऊस बसणार? हवामान खात्याची मोठी अपडेट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - महाराष्ट्रात गुढीपाडव्यापासूनच हवामानात मोठा बदल जाणवत आहे. उकाड्याच्या झळा आणि...

माजी नगरसेविकेच्या मुलाचे ‘तसले’ कृत्य! तरुणीसोबत घडलं भयंकर…

Maharashtra Crime News: माजी नगरसेविकेच्या मुलाने एका तरुणीवर प्रेमसंबंधाच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक...

विळद घाटात अपघात; भरधाव वहानाने तिघांना..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - नगर- मनमाड रस्त्यावरील विळद घाटात एका भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत...