Politics News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. महाविकास आणि महायुती दोन्ही आघाड्यांतील पक्षांकडून उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाकडून सर्वात प्रथम 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर भाजपने आत्तापर्यंत कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, भारतीय जनता पक्ष जास्त जागा लढण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 153 जागा लढवणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला रविवारी म्हणजे आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही परिस्थितीत महायुतीच्या जागावाटपाचा तिढा मिटणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज संध्याकाळी देवेंद्र फडणवी यांच्या सागर निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महायुतीचा मुंबईसहित सर्व जागांचा तिढा मिटणार असल्याची माहिती आहे.
महायुतीच्या किती जागा बाकी?
भाजप
99 + 22 = 121
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
38 + 11 + 4 = 53
शिवसेना (शिंदे)
45 = 45
एकूण 288 – 215 = 73 बाकी