spot_img
ब्रेकिंगअर्थमंत्र्यांच्या उत्तरावर बोलू न दिल्याने महाविकास आघाडीचा सभात्याग

अर्थमंत्र्यांच्या उत्तरावर बोलू न दिल्याने महाविकास आघाडीचा सभात्याग

spot_img

मुंबई : नगर सहयाद्री
विधानसभेत शुक्रवारी काँग्रेससह महाविकास आघाडी आक्रमक झाली असल्याचे पाहावयास मिळाले. अतिरिक्त अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा जास्त वेळ अर्थमंत्र्यानी घेतला.अदानीच्या सेवेसाठी हे सेवक काम करत असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

अतिरिक्त अर्थसंकल्पावरील उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या उत्तरावर बोलू न दिल्याने शुक्रवारी विरोधी पक्षाने सभात्याग केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी वडेट्टीवार यांनी सवांद साधला त्यावेळी ते बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले की, अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा जास्त वेळ घेतला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्या सगळ्या मुद्यांच्या संदर्भात आम्हाला बोलू दिले नाही. अर्थसंकल्पात आकडे फुगवून दाखवले आणि प्रत्यक्ष खर्च कमी दाखवला आहे, असा आरोप त्यांनी केला.

कृषी विभागासाठी झालेला खर्च हा मागील वर्षीच्या २०२३-२४ मध्ये एकूण तरतुदीच्या केवळ ४७ टक्के झालेला आहे. मागासवर्गीय समाजाच्या कल्याणावर झालेला खर्च हा सुद्धा अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पीय तरतूद आणि BDS वर दिलेला विनियोजन खर्च यात मोठी तफावत असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

सामाजिक व्यवस्था बिघडवण्याचे पाप या सरकारकडून होत आहे. या सरकारमध्ये जाणारे आरएसएसच्या संस्कृतीला, मनुस्मृतीला जपणारे आता निवडणुकीच्या तोंडावर सुरात सूर मिसळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे नाव घेत आहेत. इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकावर एक रुपया खर्च झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

बोलाचा भात अन बोलाची कढी केवळ वाढवून दाढी राज्यकारभार करता येत नाही, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. जवळपास मुंबईतील १३ मोक्याच्या जागा अदानीला देण्याचा घाट घातला. त्यातील पाच प्रस्ताव पूर्ण झाले आहेत. त्याचा शासननिर्णय काढला आहे. अदानीच्या राजस्थानमधील सोलर प्रकल्पातून ट्रान्समिशन करून पुढच्या दहा वर्षांसाठी महाराष्ट्राला वीज देण्याचा प्रस्ताव आणि निर्णय या सरकारने घेतला आहे. अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करत आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? कीती रुपयांची कपात होणार..

मुंबई । नगर सहयाद्री:- कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने घसरण होत आहे. कच्चा ऑईलमध्ये मार्चपासून ते...

महायुती नवा डाव टकाकणार! मध्यरात्री बैठक; विधानसभेचा जाहीरनामा ठरला? ‘या’ प्रश्नांना देणार प्राधान्य..

Politics News: लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे...

अनेकांच्या नशिबात ‘तो’ योग आला?, तुमची रास काय? वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर,...