मुंबई । नगर सहयाद्री:-
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली. त्यापूर्वी फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार या पलीकडे यांचे लाडके कोणी नव्हतं. असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री लोचट मजनू अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली. मुख्यमंत्री काल एका सभेत ताई माई अक्का सावत्र भावांना मारा बुक्का असे म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात कोणी सावत्र नाही सावत्र दिल्लीत बसलेत. असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री लोचट मजनू आहेत. अतिशय लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेला. यापूर्वी दिल्लीसमोर झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री पहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल असे वर्तन मुख्यमंत्री करतात. हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतात. ज्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी ठेवणार. महाराष्ट्राला बदल हवाय त्यासाठी आम्ही कंबर कसतो आहोत. असे खासदार संजय राऊत म्हणाले.
या महाराष्ट्रात सावत्र कोणी नाही. सावत्र आहेत ते दिल्लीत बसलेत. मोदी आणि शहा हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देतात. महाराष्ट्राचा सावत्र नाही भाऊच नाहीत ते. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी अमित शहा यांनी जेवढे महाराष्ट्राचे नुकसान केले तेवढे १०० वर्षात कुणी केल नाही. मुख्यमंत्री काल एका सभेत ताई माई अक्का सावत्र भावांना मारा बुक का असे म्हणाले होते. त्यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. सरकारी तिजोरीतून पैशांची उधळपट्टी केली. लाडया बहिणींना पैसे मिळायलाच हवे.
पण पंधराशेच्या आकड्यात आमचे सरकार आल्यावर भरघोस वाढ होईल. लोकसभा निवडणूक झाली. त्यापूर्वी फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार या पलीकडे यांचे लाडके कोणी नव्हते. कुठे देण्यात आले एकेक आमदाराला ५०-५० कोटी देण्यात आले. काही जणांना शंभर शंभर कोटी देण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये देण्यात येतात. पण लाडया बहिणीसाठी पंधराशे रुपये, अशी जोरदार टीका राऊतांनी केली.
कोणत्याही परिस्थितीत सरकार बनवायचं
महाराष्ट्रातलं वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. सत्तांतरासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार बनवायचं. पैसा आणि सत्य समोर महाराष्ट्र झुकला जाणार नाही हे आम्ही लोकसभेत दाखवून दिले असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.