Maharashtra Crime: गावाजवळ असलेल्या पाझर तलावात सोमवारी धक्कादायक घटना घडली. तलावात एका महिलेसह तिच्या दोन चिमुकल्यांचे कुजलेले मृतदेह सापडले. हे मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगताना आढळले. या तिन्ही मृतदेहांचा पंचनामा करून पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे. बुलढाणा जिल्ह्यातीलखामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी गावात सदरची घटना घडली आहे.
गावातील काही गावकऱ्यांना तलावातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. तेव्हा गावकऱ्यांनी तलावापाशी जाऊन पाहिले असता पाण्यावर एका महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. ही माहिती गावात पसरताच अनेक नागरिकांनी तलावापाशी गर्दी केली. हे तिन्ही मृतदेह बऱ्याचप्रमाणात कुजले आहेत.
आईने आपल्या दोन चिमुकल्यांना स्वःतच्या शरीराला बांधलेल्या अवस्थेत पाझर तलावात हे मृतदेह सापडले होते. या मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून त्यात पार्वती प्रकाश इंगळे (वय 30), आर्यन प्रकाश इंगळे (वय 8) आणि प्राची प्रकाश इंगळे (वय 5) यांचा समावेश आहे.
प्रारंभिक तपासानुसार, महिलेच्या कंबरेला दोन्ही मुले बांधलेले असल्याचे समोर आले आहे . काही दिवसांपासून ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. मात्र, तिने आत्महत्या का केली, याचा तपास आता पोलीस करत आहेत .याच तलावात गेल्या आठवड्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. यामुळे पिंपरी गवळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.