spot_img
देश'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राचे शिलेदार' सहा खासदारांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास, पहा एका...

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राचे शिलेदार’ सहा खासदारांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास, पहा एका क्लिकवर..

spot_img

मुंबई नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) बहुमताचा आकडा पार केल्यानं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालंय. या नव्या सरकारचा शपथविधी 9 जून 2024 रोजी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या सहा शिलेदारांनी देखील शपथ घेतली आहे.

नितीन गडकरी
मतदारसंघ – नागपूर
जन्म २७ मे १९५७
शिक्षण – एम. कॉम., एलएल. बी., डी. बी. एम.
सन १९८१ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणून नितीन गडकरी यांच्या कारकीर्दीला सुरूवात झाली. पुढे १९८९, १९९६ आणि २००२ मध्ये ते नागपूर पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून आमदार झाले. १९९६मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र, १९९९मध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, २००४ मध्ये प्रदेशाध्यक्ष, भाजप (महाराष्ट्र), २००९ मध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यानी सांभाळल्या. २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग तीन वेळा ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. २०१४ ते २०२४ ते दरम्यान त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री म्हणून छाप सोडली आहे.

रामदास आठवले
राज्यसभा सदस्य
जन्म – २५ डिसेंबर १९५९
शिक्षण – सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून शिक्षण
रामदास आठवले यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील अगलगाव या गावातील एका गरीब बौद्ध कुटुंबात झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले. प्राथमिक शिक्षण ढालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले. पुढे वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहायला गेले. त्यांची तेथे खऱ्या अर्थाने जडणघडण झाली. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली. ते पॅथरमध्ये सक्रिय झाले. तेथून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतही ते सहभागी झाले. शिवसेनेशी व सरकारशी त्यानी संघर्ष केला. १९९० मध्ये राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. आतवलेनी प्रारंभी महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले. मुंबई उत्तर मध्य आणि नंतर पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते तिसऱ्यांदा मंत्री होत आहेत. मागच्या मंत्रिमंडळात ते सामाजिक कल्याण राज्यमंत्री होते.

पीयूष गोयल
मतदारसंघ – मुंबई उत्तर
जन्म १३ जून १९६४
शिक्षण – चार्टर्ड अकाउंटंट, एलएल. बी.
माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल आणि भाजपच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे पुत्र पीयूष गोयल यांनी तरुण वयातच स्वतःला भाजपच्या संघटनात्मक कामात झोकून दिले. २०१० आणि २०१६ मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले. गोयल यांनी कोळसा, ऊर्जा, रेल्वे, वाणिज्य, कॉर्पोरेट अफेअर्स अशा खात्यांचा कार्यभार सांभाळलेला आहे. संसदेच्या अर्थ, संरक्षणविषयक विविध समित्यांवरही काम केले आहे, गेली ३५ वर्षे भाजपमध्ये विविध पदांवर आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत कार्यरत असलेल्या गोयल यांनी राष्ट्रीय खजिनदारपदही सांभाळले आहे. राज्यसभेचे सभागृह नेतेपदही त्यांनी भूषविले आहे. माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेत ते शिकले. चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत देशपातळीवर आणि विधि पदवी परीक्षेतही त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळातही काम केले आहे.

प्रतापराव जाधव
मतदारसंघ – बुलढाणा
जन्म- २५ नोव्हेंबर १९६०
शिक्षण- बी. ए. द्वितीय वर्ष
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी असलेले प्रतापराव जाधव यांचा तालुका संघटक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास राहिला आहे. ते यंदा चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. जाधववानी १९८६ पासून तालुका संघटक म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. १९९० मध्ये ते बुलढाणा जिल्हा शिवसेनाप्रमुख झाले, २०१४ ते २०१९ या काळात शिवसेना संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती. मेहकर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशी त्याची वाटचाल राहिली. १९९० मध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले. २११५ मध्ये येथूनच आमदार झाले. १९९७ ते १९१८ दरम्यान त्यांनी क्रीडा पाटबंधारे राज्यमंत्री, अकोला जिन्ह्याचे पालकमंत्रिपद साभाळले. २००९ ते २०२४ असे सलग चार वेळा ते बुलढाणा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी झाले आहे.

रक्षा खडसे
मतवार संघ – रावेर
जन्म-१३ मे १९८७
शिक्षण – बीएस्सी (संगणक)
कोथळी, ता. मुक्ताईनगर येथील सरपच ते केंद्रीय मंत्री असा त्याचा प्रवास आहे. रक्षा निखिल खडसे आता तिसन्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. खडसे यांचे खेडटिंगर, ता. शहादा (जि. नंदुरबार) हे माहेर आहे. वयाच्या २३ व्या वर्षी त्या कोथळी, ता. मुक्ताईनगरच्या सरपंच झाल्या. त्यानंतर वयाच्या २५ च्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर शिक्षण समितीच्या सभापतीही झाल्या. त्यांना दोन अपत्ये आहेत. मुलगी क्रिशिका आणि मुलगा गुरुनाथ, पती निखिल खडसे यांचे निधन झाले, त्यावेळी गुरुनाथ हा दीड वर्षांचा होता. पत्ती निधनानंतर खचून न जाता त्या सासरे आमदार एकनाथ खडसे यांच्या मदतीने राजकारणात हिमतीने उभ्या राहिल्या. वयाच्या २७ व्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. दोन वेळा खासदार राहिल्याने प्रशासन हाताळण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे.

मुरलीधर मोहोळ
मतदारसंघ – पुणे
जन्म – १ नोव्हेंबर १९७४
शिक्षण – बी.ए.
मुरलीधर मोहोळ मूळचे मुठा (ता. मुळशी) गावचे. कोल्हापुरात त्यांनी कुस्तीधे धडे गिरवले आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत त्यांनी प्रवेश केला. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष, शहर भाजप सरचिटणीस, पुणे महापालिका शिक्षण मंडळ सदस्य (२००२), महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक (२००७, २०१२, २०१७), महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद (२०१७-२०१८) त्यांनी भूषवले. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून (२०१७-१८) त्यानी काम केले, २०११- २२ ते पुण्याचे महापौर होते. अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. पीएमपीएमएल संचालक, पीएमआरडीए सभासद होते. त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक २०११ मध्ये लढवली होती. भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...