मुंबई / नगर सह्याद्री –
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद सिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. महायुती सरकारकडून ‘लाडकी बहीण योजने’ची महिलांना माहिती देणे सुरु आहे. तर प्रत्येक पक्ष आपली रणनीती अधिक धारदार करत आहे. सर्वच पक्षातील नेते आता राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करतांना दिसत आहे.
अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. आज नागपूरमध्ये राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. राज ठाकरे यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणामागे शरद पवार कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील जातीयवाद आणि फोडाफोडीचे राजकारण याला फक्त शरद पवार कारणीभूत आहे. पुलोद पसून याला सुरवात झाली. 91 मध्ये शिवसेना फोडली, भुजबळ, नारायण राणे यांना फोडले. हे राजकारण शरद पवार यांनी सुरू केले, जातीचे विष पवार यांनी पेरले. या सर्व गोष्टी राष्ट्रवादीच्य जन्मानंतर सुरू झाला, यापूर्वी महाराष्ट्र्र हा असा कधीच नव्हता, असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.
ते पुढे म्हणाले,’प्रत्येकाला निवडणुकीत उभं राहायचे आहे. आमच्यासाठी पोषक वातावरण आहे. लोक मागील पाच वर्षात जे झाले ते कंटाळले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पध्दतीने मतदान झाले, हे मतदान समजून घेतलं पाहिजे. या देशात एक गठ्ठा मुस्लिम समाजाने मोदी शहांविरोधात मतदान केले. भाजपने 400 पार संविधान बदलणार असे वक्तव्य त्यांच्याच लोकांनी केल्याने काही लोकांनी मोदी शाह विरोधात मतदान केले. असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे विदर्भातील प्रत्येक भागात जात आहे. आज राज ठाकरे नागपूरमध्ये असून जिल्ह्यातील 12 विधानसभा जागेचा ते आढावा घेणार आहेत. नागपूरमध्ये राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.