spot_img
महाराष्ट्रMaharashtra Politics News : 'शरद पवार दोन समाजांना झुंजवत ठेवतात, मराठा आरक्षणाला...

Maharashtra Politics News : ‘शरद पवार दोन समाजांना झुंजवत ठेवतात, मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध त्यांचाच’

spot_img

Maharashtra Politics News : नागपूर / नगर सह्याद्री : सध्या महाराष्ट्रात आरक्षण मुद्द्यांवरून चांगलंच गदारोळ पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा समाज, धनगर समाज यांची आरक्षणाची मागणी तर ओबीसीतून आरक्षणास विरोध करण्यासाठी ओबीसींचा एल्गार आदी घटनांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मोठा घणाघात केला आहे. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचा राहिलेला आहे असा घणाघात त्यांनी केला आहे.

भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, आरक्षणाच्या आंदोलनाची राजकीय चिंता करण्याची आवश्यकता नाही. या गोष्टींचा निवडणुकीवर परिणाम होत नाही. निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात, या आंदोलनांचा सामाजिकदृष्ट्या विचार केला पाहिजे असे ते म्हणाले. “सध्या राज्यात मराठा आरक्षणाची मोठमोठी आंदोलने सुरू आहेत.

मात्र आपण मराठा आरक्षण आंदोलनाचा इतिहास काढून पाहिला तर लक्षात येतं की, मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाही आपण सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य ऐकलं होतं की मराठा आरक्षणापेक्षाही राज्यात इतर मोठे प्रश्न आहेत.

शरद पवारांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाही मराठा आरक्षण देता आलं असतं, पण पवारांना कधी मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यांना दोन समाजांना झुंजवत ठेवायचं होतं. लोकं झुंजत राहिले तर आपल्याकडे नेतेपद येईल, असं त्यांचं राजकारण असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...