spot_img
ब्रेकिंग'महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना 'या' तारखेला मिळणार सोन्याच्या अंगठ्या'

‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना ‘या’ तारखेला मिळणार सोन्याच्या अंगठ्या’

spot_img

अहील्यानगर । नगर नगर सहयाद्री:-
नुकत्याच अहील्यानगरमध्ये भव्य आयोजनात व उत्साहात झालेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्याव पदक प्राप्त मल्लांना गुरवार दि. १३ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात बक्षीसे मिळणार आहेत. या पारितोषिकांमध्ये दोन चारचाकी गाड्या, बुलेट व स्प्लेंडर या दुचाकी गाड्या व सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. हा परितोषिक वितरण समारंभ राज्य कुस्तीगीर संघाचे नूतन उपाध्यक्ष व स्पर्धेचे संयोजक आमदार संग्राम जगताप व राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव, हिंद केसरी योगेश दोडके यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता भोसले लॉन येथे संपन्न होणार आहे, अशी महिती राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी दिली.

अहील्यानगर येथे नुकत्याच झालेल्या ६७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील गादी व माती विभागातील पदक विजेत्या कुस्तीगीरांना स्पर्धा आयोजक व राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनीही बक्षीसे देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार देण्यात येणाऱ्या फोर व्हीलर, बुलेट, टु व्हीलर गाड्या स्पर्धेच्या क्रीडानगरीत ठेवण्यात आल्याही होत्या. आता या गाड्यांचे व सोन्याच्या अंगठ्यांचे परितोषिक वितरण समारंभ गुरुवार दीनांक १३ फेब्रुवारी रोजी अहील्यानगरमध्ये आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

यामध्ये महाराष्ट्र केसरी किताब विजेता, उपविजेता यांच्यासह माती विभागातील ३० व गादी विभागातील ४० कुस्तीगीरांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील पदक विजेत्या कुस्तीगीरांनी बक्षीस रूपाने मिळणाऱ्या गाड्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणारी कागदपत्रे बरोबर आणावीत. अधिक माहितीसाठी व कागदपत्रे जमा करण्यासाठी जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव डॉ. संतोष भुजबळ मो.नं ९६५७६१००९५ व कार्यालयीन सचिव निलेश मदने मो.नं ९२२५९८५५५५ यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात राजकीय धुळवड! नाना पटोलेंची अजित पवार, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर

मुंबई । नगर सहयाद्री:- देशात सगळीकडे होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. त्यातच...

गाळे भाडे वसुलीसाठी मनपाचा ऍक्शन प्लॅन; विशेष ‘स्क्वॉड’ मैदानात, आयुक्त म्हणाले आता…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : महापालिकेच्या करसंकलन विभागासाठी गाळे भाडे थकबाकी मोठी डोकेदुखी ठरत आहे....

दूध उत्पादकांना खुशखबर; दरात दोन रुपयांनी वाढ; कधीपासून पहा..

मुंबई / नगर सह्याद्री : उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी...

नगरमध्ये तलवारीने सपासप वार; दोन गटात ‘या’ ठिकाणी राडा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहरातील घासगल्ली येथे दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या हाणामारीत...