नियोजनाची बैठक | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार असून त्यासाठी नगर मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातील पदाधिकार्यांची आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यात शहरात होणार्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली. यावेळी तिसर्यांदा आमदार पदी निवडून आल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व कुस्तीगीरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदिप आप्पा भोंडवे, सरचिटणीस हिंद केसरी पै.योगेश दोडके, महाराष्ट्र केसरी पै. सईद चाऊस, अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र केसरी पै.अशोक भाऊ शिर्के, उपाध्यक्ष पै.अर्जुन देवा शेळके, सचिव प्रा.डॉ.पै.संतोष भुजबळ, खजिनदार पै.शिवाजी चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पै.शंकर खोसे, पै.धनंजय खसे, निलेश मदने, पै.दत्तात्रय खैरे, पै.दादासाहेब पांडूळे, पै.अतुल कावळे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा.संभाजी निकाळजे, नेवासा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष प्राचार्य सोपान बाजीराव काळे सर आदी उपस्थित होते.
अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार असून त्याच्या नियोजनाची बैठक आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे. तसेच अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे तिसर्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधियाने निवडून आल्याबद्दल त्यांचा राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला असल्याची माहिती कार्याध्यक्ष पै.संदीप आप्पा भोंडवे यांनी दिली.
जिल्ह्यातील कुस्ती खेळाडूंनी तयारी करावी
नगर शहराला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान मिळाला असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वेळेची तारीख घेऊन जानेवारी महिन्यामध्ये ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होईल. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने माझा सत्कार केल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कुस्ती पटूंनी चांगली तयारी करून महाराष्ट्र केसरी किताब मिळवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.