spot_img
ब्रेकिंगमहंतांकडून आरोपींचे समर्थन हे मोठं दुर्दैव!; महंत नामदेवशास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगे काय...

महंतांकडून आरोपींचे समर्थन हे मोठं दुर्दैव!; महंत नामदेवशास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगे काय म्हणाले पहा

spot_img

बीड / नगर सह्याद्री –
राज्यात सध्या मंत्री धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्या भेटीवरून राजकारण सुरु झाले आहे. काल रात्री आमदार धनंजय मुंडे यांनी महंत नामदेवशास्त्री यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नसल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे आणि नामदेवशास्त्री यांच्या भेटीविषयी मनोज जरांगे यांनी,”संत महंत समाज घडवणारे एक न्याय मंदिर आहे. भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री असे काही बोलले असतील असे मला वाटत नाही. किंबहुना त्यांना दोष देऊन चालणार नाही. जाणाऱ्याने सांगितले असेल की असा म्हणा म्हणून. कारण ते एक मोठं श्रध्दा स्थान आहे. असे म्हटले आहे.

पुढे बोलताना मनोज जरांगे यांनी,” खंडण्याबद्दल ते बोलतील असे मला वाटत नाही. तसेच जो व्यक्ती त्या ठिकाणी गेला आहे त्याला कुठे कुठे हात पसरावे हे कळत नसावं. विकृतपणे केलेल्या कामाला समाज पाठीशी घालत नाही. तसेच वंजारी समाजाला ही हे मान्य नाही.” मात्र असे खरंच असेल तर आरोपींचं समर्थन, हे राज्याचे मोठं दुर्दैव आहे. शेवटी महंत हे महंत असतात. या कृत्याला जर कोणी समर्थन देत असेल तर ते समर्थन हे गुंडगिरीला प्रोत्साहन देणारे ठरेल. ते असे बोलले असतील तर भयंकर आहे. यात राज्याची मोठी हानी आहे. खून केल्याचा आंनद आणि गुन्हेगार यांना सोडून द्या, असा त्याचा अर्थ होत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी शुक्रवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेत आपण धनंजय मुंडे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असा संदेश दिला. आजपर्यंत भगवान गडाचा राजकीय कारणासाठी वापर करु न देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. दरम्यान या प्रकरणावर भाष्य करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

… मात्र नामदेवशास्त्री असे बोलले असतील तर हे भयंकर
नामदेवशास्त्री यांच्या या वक्तव्यामुळे संप्रदायवर परिणाम होण्याचं काही काय कारण. गुंड हे संप्रदाय चालवत नाही. ते काही बोलले असतील तर दुरुस्त करतील. त्यांना उगाच बोलवायला लावले आहे. कारण महंत खमके आहेत, ते असे बोलले असतील तर दुरूस्ती करतील. कदाचित त्यांना एक बाजू सांगितली असेल म्हणून ते बोलले असतील. दरम्यान महंत नामदेवशास्त्री यांच्यावर दबाव असेल असा मला विश्वास बसत नाही. मात्र ते असे बोलले असतील तर हे भयंकर आहे. यात राज्याची मोठी हानी आहे. खून केल्याचा आंनद आणि गुन्हेगार यांना सोडून द्या, असा त्याचा अर्थ होतो असेही मनोज जरांगे म्हणाले.

धनंजय मुंडे वातावरण दूषित करताय
त्यासोबतच “या प्रकरणात माणसाला मारून टाकले, त्याच्या रक्ताची माया दया नाही का? तुमच्यावर फाशीची वेळ आली म्हणून बाबाजी यांचा आसरा घेण्यासाठी गेले. पूर्वी दुःख देणारे हेच का मग, हीच का ती टोळी. बाबाजी यांना तुम्ही यात ओढत आहात. किंबहुना धनंजय मुंडे वातावरण दूषित करत आहेत. हा धक्कादायक विषय आहे. न्यायची अपेक्षा न करणे आणि गुंड सांभाळणे असा त्याचा अर्थ आहे. यात बाबाजीची सल गुंडांना येणार नाही. हे प्रकरण वेगळ्या दिशेने चालले आहे. यातून राज्यात भयंकर मॅसेज जाणार आहे.” असे ही मनोज जरांगे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...