spot_img
आर्थिकLPG Cylinder: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ! एलपीजी सिलेंडरच्या किमतींत झाली वाढ?

LPG Cylinder: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ! एलपीजी सिलेंडरच्या किमतींत झाली वाढ?

spot_img

LPG Cylinder Price: आजपासून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा फटका बसणार आहे. सरकारी तेल कंपन्या आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल करण्याची घोषणा केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे, तर घरगुती वापरासाठी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.

सरकारी तेल कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार, देशातील विविध शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 8 ते 9 रुपयांनी वाढल्या आहेत. दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 6.50 रुपयांनी वाढून 1652.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये 8.50 रुपयांची वाढ होऊन आता सिलेंडरची किंमत 1764.50 रुपये झाली आहे. मुंबईत सिलेंडरची किंमत 1605 रुपये झाली असून चेन्नईमध्ये ती 1817 रुपये आहे.

यापूर्वी चार महिने सतत व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत घट करण्यात येत होती. मात्र, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत शेवटचा बदल मार्चमध्ये करण्यात आला होता, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त 100 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. महागाईच्या या तडक्यामुळे व्यावसायिक क्षेत्रातील खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किंमतीतील स्थिरता सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...