Ahilyanagar Crime: कुकडी कालव्यामध्ये युवकाचा मृतदेह आढल्याने एकच खळबळ उडाली होती. प्रेम संबधातून विवाहित प्रेयसीची पतीसह आई वडिलांनी युवकाचा खून धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला होता. आता त्याच्या विवाहित प्रेयसीने बुधवारी दुपार राहत्या घरात गळफास घेतला आहे.
अधिक माहिती अशी: बीड येथील युवक रणजीत गिरी याच्या खून करून त्याचा मृतदेह कुकडी कालव्यामध्ये फेकून देण्यात आल्याची घटना 23 डिसेंबर रोजी घडली होती. रंजीत हा त्याच्या विवाहित प्रेयसीची लग्न झाल्यानंतर देखील फोनवरून संपर्क करत होता. हे त्या मुलीच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब प्रेयसीच्या आई-वडिलांना सांगितली.
त्यांनी मुलीस अनेक वेळा समजून सांगितले मात्र काही बदल होत नसल्यामुळे अखेर त्यांनी रंजीत गिरी यास संपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानुसार या मुलीच्या आईने सर्व नियोजन केले आणि जावई मुलीचे वडील आणि त्यांचे ओळखीचे एक जण या सर्वांनी मिळून प्रियकर रणजीत गिरी याचा खून केला.
याप्रकरणी पोलिसांनी संतोष बाबुराव जाधव (रा.खांडवी, ता. कर्जत), ऋषिकेश रवी बोरकर (रा.वडझिरे, ता. पारनेर), उद्धव उर्फ संतोष मांडगे (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) आणि खांडवी येथील महिलेला अटक केली होती.
दरम्यान, त्याच्या प्रेयसीने राहत्या घरात गळफास घेतला. कर्जत तालुक्यातील खांडवी येथे 25 डिसेंबरला दुपारी दोन वाजता ही घटना घडली.
यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. ज्या युवतीच्या प्रेमप्रकरणामुळे हे सर्व प्रकरण घडले तिने बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ मिरजगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.