spot_img
ब्रेकिंगलोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन

लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन

spot_img

पुणे । नगर सह्याद्री
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात दुःखद निधन झाले. त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. आज (बुधवार) सकाळी ८ ते ११ या वेळेत त्यांचे पार्थिव पुण्यातील टिळकवाडा येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी १२ नंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

‘केसरी’चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, ‘केसरी’सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला.

डॉ. दीपक टिळक यांनी ट्रस्टच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्यलढ्यातील आणि सामाजिक सुधारणांचा वारसा जपण्याचे कार्य केले. त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांना चालना देण्यासाठी योगदान दिले, तसेच पुरस्कार सोहळ्याद्वारे राष्ट्रीय नेतृत्वाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यामुळे पुण्यातील टिळक स्मारक मंदिर हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र म्हणून ओळखले जाते. दीपक टिळक यांनी काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिल्लीगेट परिसरात राडा; दुचाकी फोडल्या, तरुणांना घेरलं, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पूर्वीच्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दिल्लीगेट परिसरात राडा घातल्याची...

दिल्लीत भीषण स्फोट; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लेखोरांना तीव्र शब्दांत इशारा; एकालाही सोडणार नाही..

नवी दिल्ली | वृत्तसंस्था देशाची राजधानी दिल्ली बॉम्बस्फोटामुळे हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्‌‍याजवळील लाल किल्ला...

टाकळी ढोकेश्वरचा वाळू माफिया गजाआड ;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

१५ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू माफियाविरुद्ध...

‘मुलाचे बरेवाईट झाल्यास सोडणार नाही’; विद्यार्थिनीला धमकावणे पडले महागात, वाचा प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर प्रेमसंबंधासाठी बळजबरी, सतत पाठलाग आणि...