spot_img
अहमदनगरस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

spot_img

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात
मुंबई | नगर सह्याद्री
प्रभाग रचना, इतर मागासवर्गाचे आरक्षण तसेच अन्य मुद्यांवरून गेली अनेक वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे काउंटडाऊन सुरु झाले असून राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यात पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. दुसर्‍या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतर तिसर्‍या टप्प्यात महापालिका निवडणुका होतील, असे सूत्रांनी सांगितले.

नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होईल, नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदत कार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबर महिन्यात होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तर मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारीच्या २०२६ आत घेण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरु असताना महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ ची मुदत दिली आहे. निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शयता गृहीत धरून महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी १० दिवस अगोदर पार पाडल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिषदेला हजर राहणार आहेत. त्यामुळे २० जानेवारीपूर्वी महापालिका निवडणुका होतील, असेही सांगण्यात आले.

मतदान यंत्रासाठी मध्यप्रदेश सरकारशी करार दरम्यान, राज्यात प्रथमच मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी इलेट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) कमी पडू नयेत, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मशीन पुरवठ्यासाठी मध्य प्रदेश सरकारशी करार केला आहे. याशिवाय इलेट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ५० हजार ईव्हीएम खरेदी केली आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाकडे सुद्धा ईव्हीएमची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिका जानेवारी महिन्यात…
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. तसेच ११ नोव्हेंबर रोजी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर होणार आहे. त्यानंतरच महापालिका निवडणुकीचे राजकारण तापण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायती व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकी होणार आहेत. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यातच अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक होईल असा अंदाज बांधला जात आहे.

मतदानानंतर दुसर्‍या दिवशी मतमोजणी
स्थानिक स्वराज्य संस्थानिवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी दुसर्‍या दिवशी हाती घेतली जाईल. कारण तिन्ही टप्प्यातील निवडणुकीची एकत्र मतमोजणी शय नाही. निवडणूक यंत्रणेवरील ताण आणि मर्यादीत मनुष्यबळ लक्षात घेता प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर मतमोजणी होईल.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...

विधानसभेची मतदारयादी स्थानिक स्वराज्य संस्थेला नको ; बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले पहा

संगमनेर / नगर सह्याद्री - “राहुल गांधी यांनी मतचोरी होत असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर...