spot_img
ब्रेकिंगशेतकर्‍यांना कर्जमाफी, बहिणींना २१००; मुख्यमंत्र्यांनी केल्या १० घोषणा, पहा..

शेतकर्‍यांना कर्जमाफी, बहिणींना २१००; मुख्यमंत्र्यांनी केल्या १० घोषणा, पहा..

spot_img

कोल्हापूर | नगर सह्याद्री
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी केवळ काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता प्रत्येक पक्षाकडून जाहीरनामा देखील प्रसिद्ध करण्यात येत आहेत. असाच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील १० मोठ्या घोषणा करत राज्यातील जनतेला आश्वस्त केले आहे.

कोल्हापुरात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. येत्या २३ तारखेला छोट्या मोठ्या लवंग्यांऐवजी अँटम बॉम्ब फोडायचा आहे, असे आवाहन केले. तसेच महायुतीकडून १० घोषणा देखील एकनाथ शिंदेंनी केल्या आहेत. यामध्ये राज्यात २५ हजार महिलांची पोलीस भरती, लाडया बहिणींना प्रतिमहिना २१०० रुपये, २५ लाख रोजगार निर्मिती करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणा
राज्यातील लाडया बहिणींना प्रतिमाही २१०० रुपये, पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती. शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये. प्रत्येकाला अन्न आणि निवार्‍यांची हमी. वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपयांची मदत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार. राज्यातील तरुणांना २५ लाख रोजगार देणार. ४५ हजार पांदण रस्ते बांधणार. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना १५ हजार रुपये वेतन. वीज बिलात ३० टक्के कपात. शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार.

प्रत्येक बहीण ही लखपती व्हावी
राज्यातील महायुती सरकारने महिला भगिनींना सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. याच भूमिकेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली असून या योजनेमुळे अनेक माता भगिनींना सन्मान मिळाला आहे. लेक लाडकी’, लखपती योजने’द्वारे मुलींना १८ वर्षांच्या होईपर्यंत टप्प्याटप्प्याने १ लाख पर्यंत रक्कम मिळणार आहे. महिला बचत गटांच्या खेळत्या भाग भांडवलात वाढ केली असून त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग व मार्केटिंग करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. प्रत्येक बहीण ही लखपती व्हावी अशी आमची इच्छा असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...