spot_img
अहमदनगरनगरमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान!, कुठे घडली घटना पहा...

नगरमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान!, कुठे घडली घटना पहा…

spot_img

जेऊर येथील घटना ; वनमित्रांची मदत ; नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
नगर तालुक्यातील जेऊर येथे शुक्रवार दि. २४ रोजी विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनमित्र तसेच वनविभागाच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे. वन विभागाच्या वतीने सोडण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला वाचविण्यात यश मिळाले.




याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरातील चापेवाडीच्या शिवारात सायंकाळी सुरेश पाटोळे यांच्या विहिरीमध्ये सुमारे दोन वर्ष वयाचा बिबट्या पडला होता. वनक्षेत्रालगत असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याने त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना बिबट्या दिसला.

विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती परिसरातील वनमित्र शशिकांत पवार, सनी पाटोळे, मायकल पाटोळे, सुर्यकांत पवार, सागर पाटोळे, महेश ठोंबरे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केल्याने गोंधळ उडाला होता. परंतु वन मित्रांनी स्थानिक रहिवाशांना शांतता राखण्याचे व बिबट्याची छेडछाड न करण्याचे आवाहन केले. विहिरीत पाणी जास्त असल्याने बिबट्यास पोहताना थकवा जाणवत होता. वनमित्रांच्या मार्गदर्शनाखाली दीपक ठोंबरे, अमित नांगरे, सुरज पवार, प्रसाद गोरे, हर्षल तोडमल यांनी पाण्यात लाकडी शिडी सोडल्या नंतर बिबट्या शिडीवर बसला.

वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, वनपाल मनेष जाधव, वनरक्षक विजय चेमटे, भागिनाथ पंचमुख, वाहनचालक संदीप ठोंबरे, अक्षय ससे यांनी स्थानिकांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्यास अलगदपणे वर काढले. पकडलेल्या बिबट्यास जंगलात मुक्त करण्यात आले आहे.

चापेवाडी परिसरात बिबट्याचे वास्तव्य वारंवार आढळून आले आहे. यापूर्वी याच परिसरात मेंढपाळ भिवा घुले यांच्या तीन मेंढ्यांची शिकार करण्यात आली होती तर चांगदेव कोकाटे यांच्या गायीची, बापूसाहेब म्हस्के यांच्या शेळीची शिकार करण्यात आली होती. अनेक पाळीव कुत्र्यांच्या देखील शिकारीच्या घटना घडलेल्या आहेत. परिसरात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी तसेच नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जेऊर परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांवरून दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना तसेच लहान मुलांची देखील काळजी घ्यावी. बिबट्या दिसल्यास त्याची छेड न काढता वन विभागाशी संपर्क साधावा. सुमारे पाच वर्षांपासून जेऊर परिसरात बिबट्यांचा वावर आढळून येत असला तरी अद्याप पर्यंत मानवावर हल्ला झाल्याची घटना घडलेली नाही ही समाधानी बाब आहे. पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या आहेत. तरी सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी.
अविनाश तेलोरे (वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘गाडी बाजूला घे’ म्हटल्याचा राग; एसटी बसचालकाला मारहाण, बसवर दगडफेकही

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील पुणेरोड बसस्थानकाजवळील स्वस्तिक चौकात ‘एसटी बस वळवण्यास अडथण होत आहे,...

दारूड्याचा भाऊजीवर सपासप चाकूहल्ला ; कुठे घडला प्रकार पहा

लालटाकी येथे कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीलाही बेदम मारहाण अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील लालटाकी भागातील बारस्कर...

प्रस्तापितांचा विरोध पत्करला पण शिवाजीराव कर्डीले यांनी सर्वसामान्यांशी नाळ तुटू दिली नाही, आता अक्षय कर्डीले यांनी…

  आम्ही सर्व अक्षय कर्डिलेंच्या पाठिशी ः प्रा. राम शिंदे/ सहकार सभागृहातील सर्वपक्षीय शोकसभेत स्व....

उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात पडघम वाजले आहेत....