spot_img
अहमदनगरअवैध धंद्यांवर कारवाईचा सपाटा! नगर जिल्ह्यातील 22 जणांविरोधात गुन्हा दाखल

अवैध धंद्यांवर कारवाईचा सपाटा! नगर जिल्ह्यातील 22 जणांविरोधात गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील अवैध धंध्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा सपाटा लावला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवार व रविवार दोन दिवस जिल्ह्यातील ऑनलाईन बिंगो, अवैध देशी, विदेशी दारू तसेच गावठी हातभट्टी अशा 16 ठिकाणी छापेमारी करून दोन लाख 43 हजार 275 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 22 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

किशन संजय कांबळे (वय 27, रा. सोळातोटी कारंजा, नगर), नितीन राजन्ना भिंगारे (वय 50, रा. राज चेंबर मागे, मंगलगेट, नगर), राजेंद्र विलास पवार (रा. खातगाव टाकळी, ता. नगर), वर्षा रमेश गुंजाळ (रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा), मयुर दिलीप कांबळे (वय 20, रा. श्रीगोंदा कारखाना, ता. श्रीगोंदा), वेंकटेश रामचरण सोनकरीवार (वय 54, रा. श्रीगोंदा कारखाना, ता. श्रीगोंदा), ऋषीकेश शरद राक्षे (वय 28, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा), राधेशाम शिवशंकर तिवारी (वय 34, रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा), बिराजदार धोंडीबा कुर्‍हाडे (वय 52, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा), इम्रान अब्दुल रहिम शेख (वय 33), युनूस चाँद शेख (वय 28, दोघे रा. कुकाणा, ता. नेवासा), उत्तम दौलत कोल्हे (वय 55, रा. शहर टाकळी, ता. शेवगाव), संदीप भाऊसाहेब मोरे (वय 30, रा. बत्तरपूर, ता. शेवगाव), सुरेश लक्ष्मण नजन (वय 32), रामेश्वर भरतरी नजन (वय 27), भारत बाबासाहेब चोपडे (वय 31, तिघे रा. भातकुडगाव, ता. शेवगाव), गणेश विष्णू आंधळे (वय 34, रा. सोनसागवी, ता. शेवगाव), शौकत दिलदार शेख (वय 24, रा. राक्षी, ता. शेवगाव), ऋषीकेश उध्दव पातकळ (वय 19, रा. चापडगाव, ता. शेवगाव), ज्ञानेश्वर अण्णा उरूणकर (वय 42, रा. मिरी, ता. पाथर्डी), राजू जनार्दन सातपुते (वय 40, रा. साकेगाव, ता. पाथर्डी), गणेश आबासाहेब कराळे (वय 24, रा. कामत शिंगवे, ता. पाथर्डी) अशी गुन्हे दाखल झालेल्या अवैध धंदे करणार्‍यांची नावे आहेत.

सदरची कारवाई अधीक्षक ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अमोल भारती, पोलीस उपअधीक्षक (कर्जत) विवेकानंद वखारे व पोलीस उपअधीक्षक (शेवगाव) सुनील पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...