spot_img
अहमदनगरअहिल्यानगर शहरात सांस्कृतिक संकुल उभे रहावे यासाठी प्रयत्न करू : सभापती प्रा.राम...

अहिल्यानगर शहरात सांस्कृतिक संकुल उभे रहावे यासाठी प्रयत्न करू : सभापती प्रा.राम शिंदे

spot_img

१०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचा शानदार समारोप
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरात सांस्कृतिक संकुल उभे रहावे यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल आणि संबधित विभागाचे मंत्री, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि संबधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, त्याचप्रमाणे राज्यातील विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अधिकचा निधी मिळावा यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिली. १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला संमलेनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, विश्वस्त अशोक हांडे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, विभागीय नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.बापूसाहेब कांडेकर, संमेलन प्रमुख क्षितिज झावरे, अध्यक्ष प्रा.प्रसाद बेडेकर, प्रमुख कार्यवाह चैत्राली जावळे, नाट्य परिषदेचे नियामक मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

दूरचित्रवाणी आणि भ्रमणध्वनीच्या मोहजालात नवी पिढी अडकत असतांना तीन दिवस त्यांना उत्तम कलाविष्कारामध्ये गुंतवून ठेवण्याची किमया या नाट्य संमेलनाने केल्याचे नमूद करून प्रा.शिंदे म्हणाले, १०० व्या नाट्य संमेलनाचा मान सर्व विभागांना देवून प्रादेशिक संमेलन भरविण्याची कल्पना कौतुकास्पद आहे. मराठी रंगभूमी कलाकरांना प्रोत्साहन देण्यासाठी अहिल्यानगरचे नाट्यगृह लवकर उभे करण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल. नाटक रंगमंचावर सादर करणे हा जसा कलेचा अविष्कार आहे, तसेच कलेचा आस्वाद प्रेक्षागृहात सर्वांनी सामुहिकपणे घेणे हे कलेचे सार्थक आहे. समाजात ही बाब रुजविणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा विकास जरी झाला तरी मानवी सृजनशीलतेला ती पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे नाट्यरसिकांचा प्रतिसाद नाट्यसृष्टीला उभारी देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, नाटकांमधून विविध रसांनी युक्त लोकव्यवहार दिसतात. नाटकात विविध प्रकारच्या प्रेक्षकांना उपयुक्त ठरणारे विचार असतात. नाटक विरंगुळा देण्यासोबत बोधप्रदही असते. मराठी रंगभूमीला वैभवशाली परंपरा लाभली आहे. स्वातंत्र्य चळवळीचा प्रसार आणि सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करण्यात मराठी नाटकाचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्नांची मांडणी मराठी रंगभूमीने केली, असेही प्रा.शिंदे म्हणाले.

डॉ. जब्बार पटेल म्हणाले, अहिल्यानगरसारख्या शहरात सगळ्या कलांना वाव मिळेल यासाठी सांस्कृतिक संकुलाची आवश्यकता आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठी, लहान नाटकासाठी, नाटक आणि नृत्याच्या तालमीसाठी, ग्रामीण भागातील लघुचित्रपट निर्मिती करणाऱ्या नवतरुणांसाठी सभागृहाची व्यवस्था यात असावी. विविध कलांची दालने असावी. त्यातुन लहान गावापर्यंत ही कलेची चळवळ पोहोचू शकेल. विविध विकासकामांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांस्कृतिक वारशाची जपणूकही करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीलाच संजोग धोत्रे यांनी लिहिलेल्या व पवन नाईक यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते ‘शिदोरी’ या समरणिकेचे ही थाटात प्रकाशन करण्यात आले. अत्यंत कमी वेळामध्ये उत्साहवर्धक वातावरणात नाट्यसंमेलनाचे आयोजनाबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्यकलेला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दर्जेदार व सर्व सुविधांनी युक्त नाट्यगृहाची उभारणी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच स्वागताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर, मोहन जोशी, अजित भुरे, अशोक हांडे यांनी यावेळी विचार व्यक्त केले. विभागीय नाट्यसंमेलन प्रमुख क्षितिज झावरे यांनी विभागीय नाट्यसंमेलनाविषयी माहिती दिली. प्रसाद बेडेकर यांनी प्रास्ताविक तर चैत्राली जावळे यांनी सूत्रसंचालन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सातव्या मजल्यावरून कोसळला कामगार; जागीच मृत्यू, अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील कल्पवृक्ष सोसायटीमध्ये सुरू असलेल्या इमारत बांधकामादरम्यान...

सासुरवाडीने काढला जावयाचा काटा! घरगुती वादात कुऱ्हाडीने वार नंतर…

Maharashtra Crime : कौटुंबिक वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नातेसंबंधातील...

आजचे राशी भविष्य! दोन राशींसाठी आजचा दिवस लाभदायक… वाचा तुमच्या राशीत आज काय?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका - अन्यथा...

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....