अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर शहरातील बोल्हेगावातील परिसरात राहत असलेल्या अक्षय गुंजाळ या तरुणावर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात हा तरुण जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहिल्या नगर शहरातील बोल्हेगाव या गजबजलेल्या ठिकाणी बिबट्याने एका युवकावर दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला आहे. बोल्हेगावला जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलाजवळ हि घटना घडली आहे.
या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे.तसेच या नदीजवळ बाहेर राज्यातील लोक मोठ्या कामाला आलेले आहेत तिथे त्यांची लोकवस्ती आहे.बिबट्याने अक्षय चंद्रशेखर गुंजाळ या युवकार प्राणघातक हल्ला केला त्याच्या पायाला बिबट्याने चावा घेतला आहे,
त्यामुळे नगर शहरात तसेच बोल्हेगाव परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.जखमी अक्षय गुंजाळ याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.