spot_img
अहमदनगरशेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; कुठे घडली घटना

शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; कुठे घडली घटना

spot_img

छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री:-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील एका 31 वषय महिलेवर बिबट्याने प्राण घातक हल्ला केला. शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून यात महिला जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रेणुका विठ्ठल वीर (वय 31) असे बिबट्याच्या हल्ल्‌‍यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. अन्न पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावशिवाराकडे येत आहेत. यामुळे गावशिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेकांना शेतशिवारात बिबट्या निदर्शनास पडला होता. दरम्यान शेतामध्ये कापूस वेचणीचे काम सुरु असून रेणुका वीर ह्या आपल्या शेतामध्ये मुलांसह कापसाची वेचणी करण्याचे काम करत होत्या.

कापूस वेचणीच्या कामात व्यस्त असताना पाठीमागून अचानक बिबट्याने त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला चढवला. यामध्ये रेणुका यांच्या पायाला आणि हाताला जखम झाली आहे. आईवर बिबट्याने हल्ला केल्याचे पाहून मुलांनी आरडा ओरड केल्यानंतर बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. यानंतर रेणुका यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वाळू तस्करीतून पारनेरमध्ये गुन्हेगारीचा कहर; पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टनरशिप?

भ्रष्ट पोलिसांच्या आश्रयाने गुन्हेगार बिनधास्त! वाळू तस्करीच्या वादात युवकाला मारहाण, फक्त एकाला अटक; पोलिसांची...

हार्दिकला मोठा झटका, शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी

आशिया कपसाठी सूर्याच्या शिलेदारांची निवड नगर सह्याद्री वेब टीम - आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज घोषणा...

बंदुकीच्या धाकाने पत्नीला मारहाण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील सागर हॉटेलजवळ राहणाऱ्या स्नेहल निखिल शेकडे...

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर; कारण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात सन 2005 पासून कंत्राटी पद्धतीने काम...