spot_img
ब्रेकिंगबिबट्याची मायलेकरांवर झेप! घरात घुसून हल्ला, अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

बिबट्याची मायलेकरांवर झेप! घरात घुसून हल्ला, अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

spot_img

अकोले । नगर सहयाद्री:-
अकोले तालुक्यातील देवठाण गावातील काळे वस्तीवर भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या घरात घुसला व मायलेकावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. परंतु, दोन्ही मुलांच्या धाडसामुळे आई बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. किसनाबाई रामहरी काळे (वय ५७) व वैभव रामहरी काळे (वय २७) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

देवठाण येथील पाटाच्या कडेला असणाऱ्या काळे वस्तीवरील घरात रात्री जेवणानंतर सर्वजण झोपलेले होते. रात्री दीड वाजेच्या सुमारास मांजराच्या मागे बिबट्या लागला. तो दरवाजा तोडून थेट घरात गेला. दरवाजाचा आवाज आल्यामुळे किसनाबाई या उठल्या. त्यांनी बिबट्या पाहिल्यावर आरडाओरडा केला. त्यामुळे त्यांची मुले उठली. त्यांनी आई किसनाबाई यांच्यावर सुरू असणारा बिबट्याचा हल्ला परतवून लावला. पण बिबट्याचा पंजा लागल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. डोक्यातून मोठा रक्तस्राव होत होता. त्यांच्या डोक्याला दहा टाके पडले आहेत तर वैभवच्या पाठीवर व हाताला बिबट्याचा दात लागल्याने तोही जखमी झाला आहे.

या सर्व गोंधळात बिबट्या काही वेळ घरातील आतील खोलीमध्ये शिरला. नंतर त्याने तेथून अलगद पोबारा केला.या घटनेची माहिती देवठाण गावचे माजी सरपंच अरुण शेळके यांना मिळताच त्यांनी अकोले वन विभागाचे धिंदळे यांना फोन केला. त्यांनी सहकाऱ्यांसह अर्ध्या तासात घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्रथमोपचारासाठी देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करुन नंतर नाशिक येथील शासकीय रुग्णालयात येथे हलविले. तेथून अकोलेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. जखमींना मदत मिळावी व काळे वस्तीवर तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी देवठाण ग्रामस्थांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाऊस अन पुरामुळे कहर! सर्वोतोपरी मदत करण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन….

नगर सह्याद्री बेव टीम : सध्या ईशान्येकडील भागात खूप विनाश झाला आहे. आसामपासून ते सिक्कीम,...

आमदार संग्राम जगताप यांनी घेतला टीकाकारांचा समाचार; किंमत नसणाऱ्यांना… , काय म्हणाले पहा

चाणक्य चौक आदर्श कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ अहिल्यानगर| नगर सह्याद्री मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे...

गुन्हेगारांना सोडणार नाही ; एसपी सोमनाथ घार्गे नेमकं काय म्हणाले पहा

अहिल्यानगर| नगर सह्याद्री जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. पोलिसांनी आता अधिक दक्ष राहण्याची गरज...

शेतकर्‍यांनो पेरणीची घाई करु नका ; कृषी विभागाने दिला रेड सिग्नल, काय म्हणाले पहा

आता निघणार घाम | १२ जूनपासून मान्सून सक्रीय होणार मुंबई | नगर सह्याद्री देशातील शेती आणि...