spot_img
ब्रेकिंगविधान परिषदेच्या निवडणुकीला लागणार ब्रेक? 'हा' पक्ष ठोठावणार सर्वोच्च न्यायालयाचा 'दरवाजा'

विधान परिषदेच्या निवडणुकीला लागणार ब्रेक? ‘हा’ पक्ष ठोठावणार सर्वोच्च न्यायालयाचा ‘दरवाजा’

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे महायुतीवर कुरघोडी करण्यासाठी नाराज आमदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करुन धक्कातंत्र वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सर्वांनाच धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी ११ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शयता वर्तविण्यात येत आहे.

यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे. जर याचिका दाखल केली तर विधान परिषद निवडणूक कायदेशीर पेचात अडकू शकते. विधानसभेच्या निवडणुकात तोंडावर असताना विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई सुरु असतानाच या नव्या मुद्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...