Maharashtra Crime News: प्रियकराने प्रियसीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, तरूणाने गर्लफ्रेंडसाठी बायकोला सोडले होते. त्यानंतर आणखी एका मुलीच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत खटके उडायला लागले, त्यातूनच त्याने गर्लफ्रेंडला संपवले. याप्रकरणी पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
मनोर गावात एका व्यक्तीने गर्लफ्रेंडसाठी पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर नालासोपारा येथील ४० वर्षीय गर्लफ्रेंडसोबत राहत होता. क्षुल्लक कारणामुळे ३२ वर्षीय आरोपीने ४० वर्षीय गर्लफ्रेंडचा जीव घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी पीडित महिला प्रियकराच्या घरी आली होती. त्यावेळी पीडित महिलेने प्रियकराला दुसऱ्या महिलेसोबतच्या कथित संबंधावर जाब विचारला, अन् पोलिसांत तक्रार करणार असल्याचं सांगितलं. दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली. त्यामुळे ३२ वर्षीय आरोपी भडकला.
आरोपीने पीडित महिलेला त्यावेळी बेदम मारहाण केली, यात महिला गंभीर जखमी झाली. शेजारच्यांनी तिला रूग्णालयात दाखल केले, पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.